• Download App
    विराट मदत ! कोहली कपल #InThisTogether ; Ketto सोबत मिळून ७ दिवसात उभे करणार ७ कोटी Virat Help ! Kohli couple #InThisTogether; Together with Ketto, it will raise Rs 7 crore in 7 days

    विराट मदत ! कोहली कपल #InThisTogether ; Ketto सोबत मिळून ७ दिवसात उभे करणार ७ कोटी

    • विराट अनुष्काने कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दिले २ कोटी .

    • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर घरी परतला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे अशातच अनेक परदेशी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटपटूंनी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Virat Help ! Kohli couple #InThisTogether; Together with Ketto, it will raise Rs 7 crore in 7 days

    विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामधे तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “मी आणि अनुष्काने केट्टोसोबत मिळून एक मोहीम सुरू केली आहे.

    ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अधिक देणगी जमा करता येईल. त्यामध्ये आपण केलेल्या सहकार्याने आम्हाला आनंद होईल. आपण एकत्र येऊया आणि आपल्या आजूबाजूच्या गरजूंची सेवा करूया आणि त्यांना मदत करूया.”

    केट्टो ही आशियातील सर्वात मोठी विश्वसनीय संस्था आहे. जिथे कुठल्याही चांगल्या उपक्रमासाठी निधी गोळा करणे, दान करणे आणि लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले जाते. तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी २ कोटींची मदत केली आहे.

    केट्टो डॉट ओआरजी (ketto.org) या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवरून#InThisTogether या नावाने हा निधीउभारण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यातला दोन कोटी रुपयांचा निधी हे दाम्पत्य स्वतः देणार आहे. आजच अनुष्का शर्माने स्वतः इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या उपक्रमाची माहिती दिली आहे.

    #InThisTogether हा उपक्रम Ketto वर सात दिवस चालवला जाणार आहे.
    https://www.ketto.org/fundraiser/inthistogether या लिंकवर त्याची माहिती उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच निधी दानही करता येऊ शकेल. या उपक्रमात आतापर्यंत विराट-अनुष्काच्या दोन कोटींव्यतिरिक्त 42 लाखांहून अधिक रक्कम अवघ्या काही तासांत जमा झाली आहे. या उपक्रमातून जमा झालेला निधी ACT Grants या संस्थेकडे दिला जाणार आहे. ही संस्था या उपक्रमाची इम्प्लिमेंटेशन पार्टनर (Implementation Partner) म्हणून काम करणार आहे. ही संस्था ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्धता, लसीकरण जनजागृती, टेलिमेडिसीन फॅसिलिटीज आदी प्रकारचं कार्य करत आहे. विराट-अनुष्काच्या उपक्रमातून गोळा झालेला निधी या संस्थेच्या कार्यासाठी दिला जाणार आहे.

    Virat Help ! Kohli couple #InThisTogether; Together with Ketto, it will raise Rs 7 crore in 7 days

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!