• Download App
    लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारलाVIP Bags Reveals Over Viral Ad Promoting Love Jihad, Denies Any Connection With It

    लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला

    वृत्तसंस्था

    कोची : ईदच्या शुभेच्छा जाहिरातीच्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या स्काय बॅगच्या जाहिरातीविरोधात नेटकऱ्यांनी हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे. यावर उत्पादक कंपनीने स्पष्टीकरण जारी करत व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. VIP Bags Reveals Over Viral Ad Promoting Love Jihad, Denies Any Connection With It

    कंपनीच्या म्हणण्यानुसार, या जाहिरातीच्या निर्मात्याने बेकायदेशीरपणे व्हीआयपी आणि स्कायबॅग ब्रँड नावांचा वापर केला आहे आणि कंपनी आणि ब्रँड नावांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.

    व्हीआयपी लगेजचे अध्यक्ष दिलीप पिरामल यांनी व्हिडीओ बनवणाऱ्या कंपनीच्या नावाचा आणि ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर केल्याबद्दल पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हा व्हिडिओ/जाहिरात तयार करून पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    आपल्या तक्रारीत अध्यक्षांनी म्हटले आहे की, “जाहिरातीची कॉपी करून विविध सोशल मीडियावर प्रसारित केली गेली आहे आणि यामुळे कंपनीच्या ब्रँडचे नाव खराब होत आहे. VIP Ind ने ही जाहिरात काढलेली नाही किंवा पोस्टही केलेली नाही. ज्या व्यक्तीने ही जाहिरात पोस्ट केली आहे त्याच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही. ही जाहिरात मुळात ‘पफिंग्टन घोस्ट’ नावाच्या फेसबुक युझरने पोस्ट केली आहे.”

    काय आहे वादग्रस्त जाहिरातीत?

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुस्लिम पुरुष एका हिंदू मुलीची बिंदी काढतो. ती त्याची मैत्रीण दाखवण्यात आली आहे. कथितपणे तो तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिला बुरखा घालायला लावतो. यावरून व्हीआयपी बॅग्जने धर्मांतराचा प्रचार करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याचा दावा करण्यात येत होता.

    लव्ह जिहादची प्रथा सामान्य करण्याच्या कथित प्रयत्नामुळे रमजान ग्रीटिंग्ज असे व्हिडिओचे कॅप्शनदेखील चर्चेत आले आहे. आंदोलक याला सॉफ्ट कन्व्हर्जन टॅक्टिस म्हणत आहेत.

    अहवालानुसार, व्हीआयपी बॅगसाठीच्या जाहिरातीतील ऑडिओ आणि स्काय बॅगसाठीच्या जाहिरातीतील व्हिडिओ एकत्र करून ही क्लिप तयार करण्यात आली आहे. हा व्हिडिओ स्वतः दिग्दर्शक सुमीरा शिक यांनी ‘#SufiyumSujathayum’ हॅशटॅगसह पोस्ट केला आहे.

    ही घटना नेटकऱ्यांसाठी एक धडा आहे जे आंधळेपणाने व्हिडिओ शेअर करतात. व्हिडिओबद्दल फॅक्ट चेक केल्याशिवाय अनेक जण ट्रेंडला फॉलो करण्याच्या नादात फेक न्यूजचे बळी ठरतात.

    VIP Bags Reveals Over Viral Ad Promoting Love Jihad, Denies Any Connection With It

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!