विशेष प्रतिनिधी
इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू झाले. यावेळी काही हिंसक घटना घडल्या असल्याची बातमी समोर येत आहे. या हिंसक घटत २ जणांचा मृत्यूही झाला असल्याची माहिती आहे. Violent turn in Manipur assembly elections
हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळत आहे. सेनापती भागात मतदान केंद्रावर मतदारांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल भागात भाजपचे नेते एच बिजॉय यांच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब ने हल्ला केला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली
मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २२ जागांसाठी शनिवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात थौबल, चंदेल, उखरुल, सेनापती, तामेंगलाँग आणि जिरीबाम जिल्ह्यातील २२ जागांसाठी मतदान सुरू आहे.
Violent turn in Manipur assembly elections
महत्त्वाच्या बातम्या
- तोकडे कपडे घातले म्हणून युवतींना मारहाण; पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा
- भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे; जडेजा- अश्विनची शतकी भागीदारी
- भारताचा गहू उत्कृष्ठ, अफगाणी जनतेकडून समाधान ; निकृष्ठ पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानवर टीकास्त्र
- Shane Warne : You lived life King Size, सुपरस्टार कपिल देवची श्रध्दांजली