वृत्तसंस्था
तिरूअनंतपुरम : केरळमध्ये कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI ने शुक्रवारी केरळ बंद पुकारून शहरा – शहरांमध्ये दगडफेक, गाड्यांची तोडफोड करून हिंसाचार माजवला. केरळ हायकोर्टाने या घटनांची स्वत:हून दखल घेऊन बंद पुकारण्यावर बंदी असताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाऊ शकत नाही, असे पीएफआय संघटनेला ठणकावले आहे. 7 दिवसांची नोटीस न देता कोणीही परस्पर बंद पुकारू शकत नाही. हा बेकायदेशीर बंद पुकारून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही हायकोर्टाने राज्य प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात, असे न्यायालयाने सरकारला सांगितले. Violent strike by PFI against NIA raids; A High Court case was filed against the leader
एनआयएने केलेल्या कठोर कायदेशीर कारवाई विरुद्ध पीएफआयने केरळात ठिकठिकाणी मोर्चे काढून हिंसाचार माजवला.
तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोझिकोड, वायनाड आणि अलप्पुझा यासह विविध जिल्ह्यांमध्ये केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. सकाळी कन्नूरमधील नारायणपारा येथे वितरणासाठी वर्तमानपत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनावर पेट्रोल बॉम्ब फेकला.
काही जणांना किरकोळ दुखापत
अलाप्पुझा येथे, केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, एक टँकर लॉरी आणि काही इतर वाहनांचे दगडफेकीत नुकसान केले. कोझिकोड आणि कन्नूरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत 15 वर्षीय मुलगी आणि एक ऑटो-रिक्षा चालक किरकोळ जखमी झाले.
सरकारचे कारवाईचे आदेश
पीएफआयने राज्यव्यापी बंद पुकारल्यानंतर केरळ पोलिसांनी राज्यात सुरक्षा वाढवली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एनआयएने कारवाई केली
ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले त्या ठिकाणी गुरुवारी पीएफआय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. केंद्र आणि त्यांच्या तपास यंत्रणांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, सुरक्षा बळकट करण्यासाठी अशा सर्व ठिकाणी केंद्रीय दले आधीच तैनात करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष सीपी मोहम्मद बशीर, राष्ट्रीय अध्यक्ष ओएमए सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन एलमाराम, माजी अध्यक्ष ई अबुबकर आदींचा समावेश आहे.
Violent strike by PFI against NIA raids; A High Court case was filed against the leader
महत्वाच्या बातम्या
- पीएफआयवरील एनआयएच्या कारवाईवर प्रकाश आंबेडकर म्हणाले: टेरर फंडिंगचे पुरावे दाखवा, नाहीतर लोक मुस्लिमविरोधी अजेंडा मानतील
- ‘दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर राजकारण करू नका’, संयुक्त राष्ट्रात भारताने दहशतवाद्यांवर ठणकावले
- NIA छापे : कट्टरतावादी संघटना “ऑपरेशन PFI” यशस्वी झाले कसे??; रहस्य काय??, पुढे होणार काय??
- दलाई लामा : चीनमध्ये नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मोकळ्या मरण पत्करायला आवडेल