• Download App
    कर्नाटकात आरक्षणावरून हिंसक आंदोलन, येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक, बंजारा आणि भोवी समाजाच्या निषेध|Violent protest over reservation in Karnataka, stone pelting at Yeddyurappa's house, Banjara and Bhovi community protests

    कर्नाटकात आरक्षणावरून हिंसक आंदोलन, येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक, बंजारा आणि भोवी समाजाच्या निषेध

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. बंजारा आणि भोवी समाजातील लोकांनी शिवमोग्गा येथील येडियुरप्पा यांच्या घराबाहेर हिंसक निदर्शने केली.Violent protest over reservation in Karnataka, stone pelting at Yeddyurappa’s house, Banjara and Bhovi community protests

    अनुसूचित जातींना (एससी) देण्यात येणारे आरक्षण या वर्गातील विविध जातींमध्ये विभागले जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला बंजारा आणि भोवी समाजाचा विरोध आहे. यामुळे त्यांच्या समाजातील लोकांवर अन्याय होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.



    राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस पाठवली

    एससी समाजाचे आरक्षण त्यामध्ये येणाऱ्या जातींमध्ये विभागून देण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. न्यायमूर्ती सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या आधारे ही शिफारस पाठवण्यात आली आहे. ही शिफारस मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून होत आहे.

    या आयोगाने आपल्या अहवालात अनुसूचित जाती जमातींतर्गत येणाऱ्या जातींना गुणोत्तरानुसार आरक्षण (प्रपोर्शनल रिझर्वेशन) देण्याचा सल्ला दिला होता. हा अहवाल एससी समाजात येणाऱ्या जातींमध्ये फूट पाडण्याचे काम करेल, असा आरोप बंजारा समाजाच्या लोकांनी केला आहे.

    पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पिटाळले

    बंजारा आणि भोवी समाजातील हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. आंदोलकांनी येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पोस्टरही जाळले. पोलिसांनी आंदोलकांचा पाठलाग करून लाठीचार्ज केला आणि वॉटर कॅननचाही वापर केला. यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

    Violent protest over reservation in Karnataka, stone pelting at Yeddyurappa’s house, Banjara and Bhovi community protests

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India Census 2027 : जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान होईल, सरकार घरांची यादी आणि माहिती गोळा करेल

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- ते हिंसा पसरवत नव्हते; सर्वोच्च न्यायालयात सांगितले- वस्तुस्थिती तोडूनमोडून गुन्हेगार ठरवले

    Atishi’s : आतिशी यांच्या व्हिडिओवर पंजाबमध्ये गदारोळ; विरोधक म्हणाले- शीख गुरुंचा अपमान केला; म्हणाल्या- ‘कुत्र्यांचा आदर करा’ असे म्हटले होते