प्रतिनिधी
नंदुरबार : आंतरधर्मीय विवाहाची माहिती समोर येताच मंगळवारी मध्यरात्री नंदुरबार शहरातील मध्यवस्तीत सुमारे दीडशेपेक्षा अधिक लोकांच्या जमावाने परिसरात दगड, विटा आणि काचेच्या बाटल्यांचा तुफान मारा केला. त्यांना पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिस ताफ्यावरही जमावाने हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर पोलिसांनी किमान 27 दंगेखोरांसह आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणालाही ताब्यात घेतले आहे. बुधवारी यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.Violent midnight clashes in Nandurbar over interfaith marriage; Stone-brick pelting, police injured
शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा ते अलिसाहब मोहल्ला या परिसरात मंगळवारी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास मोठा जमाव दगडफेक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने तिकडे रवाना झाले. त्या वेळी तिथे दीडशेपेक्षा अधिक आक्रमक लोकांचा जमाव होता. ते दगड, विटा आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करीत परिसरातील वाहने, घरे आणि मालमत्तेचे नुकसान करीत होते. या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; मात्र जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. दगड आणि विटांच्या माऱ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक, शहर पोलिस निरीक्षक यांच्यासह काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
पोलिसांचा आधी लाठीमार, नंतर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या
आक्रमक जमावाने दिसेल त्या वाहनाचे नुकसान केले, बंद घरांच्या दारांवर हल्ला केले, वीजपुरवठा करणारे वायर्सही कापले. परिसरात काचेच्या बाटल्यांचा अक्षरश: ढीग पडला होता. या दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अन्य पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हे देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आधी लाठीमार सुरू केला. मात्र, त्याला हिंसक जमाव काहीही जुमानत नव्हता. पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्यानंतर अश्रुधुराच्या 7 नळकांड्या फोडण्यात आल्या.
Violent midnight clashes in Nandurbar over interfaith marriage; Stone-brick pelting, police injured
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!
- मिशन ‘अमृत सरोवर’मुळे देशातील पाण्याचा प्रश्न सुटणार! ४० हजारांहून अधिक अमृत तलाव तयार
- मुंबईत २० कोटींचे अमलीपदार्थ जप्त; तीन परदेशी नागरिकांना अटक!
- Karnataka Assembly Election : अभिनेता किच्चा सुदीप करणार भाजपाचा प्रचार; मुख्यमंत्री बोम्मईंच्या उपस्थितीत पत्रकारपरिषदेत स्वत: केले जाहीर