• Download App
    पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी; 4 कैदी आपसात भिडले; 2 ठार, 2 गंभीर|Violent clashes between inmates in Punjab's Sangrur Jail; 4 The prisoners clashed; 2 killed, 2 seriously

    पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी; 4 कैदी आपसात भिडले; 2 ठार, 2 गंभीर

    वृत्तसंस्था

    चंदिगड : पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारागृहातील चार कैदी एकमेकांशी भिडले. या लढतीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आणले असता दोन कैद्यांचा मृत्यू झाला.Violent clashes between inmates in Punjab’s Sangrur Jail; 4 The prisoners clashed; 2 killed, 2 seriously

    संगरूर रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन कैद्यांचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर, दोन कैद्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना राजिंद्र मेडिकल कॉलेज, पटियाला येथे रेफर करण्यात आले आहे. हर्ष आणि धर्मेंद्र अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत, तर गगनदीप सिंग आणि मुहम्मद शाहबाज यांची प्रकृती चिंताजनक आहे.



    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरनजीत सिंग उर्फ ​​जुझारसह त्याच्या 8 साथीदारांनी मोहम्मद शाहबाज आणि त्याच्या साथीदारांवर कटरने हल्ला केला. सिमरनजीत सिंग हा जुझार टोळीचा म्होरक्या आहे. तो अमृतसरच्या रसूलपूर कालेरचा रहिवासी आहे. त्याच्यावर 302, 307 आणि खंडणीचे सुमारे 18 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. जुझार जवळपास 6 वर्षांपासून तुरुंगात आहे.

    गुंडांशी संबंध असल्याचा संशय

    प्राथमिक तपासात या चार कैद्यांचे गुंडांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलिस त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड काढत आहेत. त्याचबरोबर मारामारीचे खरे कारण समोर यावे, यासाठी या मारामारीत जखमी झालेल्या दोन कैद्यांचे जबाब घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    कारागृहाच्या आत आणि बाहेर सुरक्षा वाढवली

    कैद्यांमधील हिंसक हाणामारी आणि दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही सक्रिय झाले. त्यानंतर कारागृहाच्या आत आणि बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जखमी कैद्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

    Violent clashes between inmates in Punjab’s Sangrur Jail; 4 The prisoners clashed; 2 killed, 2 seriously

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!