Violence in Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विजयानंतर तृणमूल कॉंग्रेस तीव्र उत्साहात भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. अहवालानुसार, हिंसाचारात आतापर्यंत 5 जण ठार झाले आहेत. Violence in Bengal After Election Results, BJP Started Helpline For Party Workers
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विजयानंतर तृणमूल कॉंग्रेस तीव्र उत्साहात भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. अहवालानुसार, हिंसाचारात आतापर्यंत 5 जण ठार झाले आहेत. त्याचवेळी आरामबागमधील भाजप कार्यालयाला तृणमूलच्या गुंडांनी पेटवून दिले. भाजप नेते संबित पात्रा आणि अमित मालवीय यांनी यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तृणमूलवर भाजपने आरोप केले आहेत.
दुसरीकडे, नंदीग्राममध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता, भाजप कार्यालयात तोडफोड करून आग लावण्याचा प्रयत्न झाला. या घटनेसाठीही भाजपने तृणमूलवर आरोप केला आहे. केवळ भाजप कार्यालयच नव्हे, तर सर्वसामान्यांची बरीच दुकाने आणि घरे तोडण्यात आली आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गुंडांनी तेथून पळ काढला.
सोमवारी (3 मे) न्यूज 18च्या पत्रकार पायल मेहता यांनी अशाच एका प्राणघातक हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले होते. कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिज्युअलमध्ये हिंसक जमावाने रविवारी सायंकाळी दक्षिण कोलकाताच्या कसबा परिसरातील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला केला. व्हिडिओच्या सुमारे 15 सेकंदात, तृणमूल कॉंग्रेसचा झेंडा दिसला. गुंडांनी घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
भाजपकडून हेल्पलाइन जारी
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या वतीनेही कार्यकर्त्यांच्या रक्षणसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदार चंदना बौरी यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली. ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, “बंगालमध्ये कधीही, कुठेही भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत हिंसा होत असेल तर त्वरित या क्रमांकांवर फोन करावा. नबादीप :-8240394596, 9831926617, उत्तर बंगाल:7890414808, 7003243060. मा. पंतप्रधान मोदीजी व मा. अमित शाहजी कृपया बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावा, हजारो कार्यकर्ते संकटात आहेत.”
रविवारी (२ मे) टीव्ही 9चे पत्रकार अनिंद्य यांनी कोलकात्यामधील बेलेघाटा भागातील आणखी एक भयंकर व्हिडिओ शेअर केला आहे. यात भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध हिंसाचार दिसून येतोय. त्यांनी ट्विट केलं की, “कोलकाता येथील बेलेघाटा येथे हिंसाचार वाढला आहे. हे पार्क स्ट्रीटपासून केवळ 7 किमी अंतरावर आहे. जवळपास कोठेही मीडियाला अनुमती नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे.”
निकालानंतरच्या हिंसाचारात चार ठार
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होत आहे. गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात नादियातील भाजप कार्यकर्ते, वर्धमानमधील टीएमसी आणि उत्तर 24 परगणामधील आयएसएफ कार्यकर्त्याचा बळी गेला.
निवडणूक आयोगाला भाजपचे निवेदन
कोलकाताच्या उल्टाडंगा भागात काल रात्री एका भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून जीवे मारण्यात आले. याशिवाय दक्षिण 24 परगणामधील सोनारपुरातही एका भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यादरम्यान बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी या हिंसाचाराबद्दल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
Violence in Bengal After Election Results, BJP Started Helpline For Party Workers
महत्त्वाच्या बातम्या
- भावी डॉक्टर, नर्स बनणार आता कोव्हिड योद्धे; 100 दिवस सेवा केल्यास शासकीय नोकरीही
- कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सिटी स्कॅनचा फायदा नाही ; डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा
- बंगाल निकालानंतर 24 तासांत हिंसाचारात 5 भाजप कार्यकर्त्यांचा बळी, राज्यपालांनी डीजीपींना बोलावले
- केंद्र सरकारचे सीरमला सर्वोत्परी सहकार्य ; आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण
- द्रमुकचा विजय : महिलेने जीभ कापून नवस फेडला ; तमिळनाडूतील धक्कादायक घटना