• Download App
    violence in Bareilly योगींच्या पोलिसांनी आवळल्या मौलाना तौकिर रजा सकट 10 समर्थकांच्या मुसक्या; I love Mohammad च्या निमित्ताने बरेलीत दंगल घडवायचा होता डाव!!

    योगींच्या पोलिसांनी आवळल्या मौलाना तौकिर रजा सकट 10 समर्थकांच्या मुसक्या; I love Mohammad च्या निमित्ताने बरेलीत दंगल घडवायचा होता डाव!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : I love Mohammad ही मोहीम चालवून त्यानिमित्ताने बरेली मध्ये आणि त्या पाठोपाठ संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठ्या जातीय दंगली घडवायचा डाव मौलाना तौकीर रजा त्याच्या समर्थकांनी आखला होता परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोलीस प्रशासनाने अचूक वेळी कठोर कारवाई करून तो डाव हाणून पाडला. मौलाना तौकीर रजा याच्यासह त्याच्या 10 समर्थकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना कोठडी टाकण्याचे आदेश दिले. violence in Bareilly

    I love Mohammad ही मोहीम चालवून शुक्रवारी नमाज्यानंतर बरेली मध्ये दंगल घडवायचा डाव मौलाना तौकीर रजा आणि त्याच्या समर्थकांनी आखला होता. बरेलीच्या प्रशासनाला त्याची भनक लागतात प्रशासनाने संपूर्ण शहरात 163 आणि 144 कलमे लागू केली. मौलानाच्या संघटनेच्या प्रवक्त्यांना प्रशासनाने बोलवून तंबी दिली. मौलानाचे प्रवक्ते नदीम आणि नफिज यांना पोलीस ठाण्यांमध्ये समक्ष बोलून समज देण्यात आली. कुठल्याही कारणासाठी कुठल्याही परिसरात जमाव जमवू नये त्याचबरोबर प्रशासनाच्या परवानगीशिवाय कुठल्याही कार्यक्रम घेऊ नये असे त्यांना बजावण्यात आले. तसे त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले त्यांच्यावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. मौलाना तौकीर रजा याच्याकडूनही त्याच स्वरूपाचे लेखी घेण्यात आले.

    परंतु दुसऱ्या दिवशी मौलाना आणि त्याचे साथीदार फिरले आणि त्यांनी सरकारी डॉक्युमेंट फेक असल्याचा दावा केला. त्याचबरोबर आपल्या सह्या सुद्धा फेक असल्याचे व्हिडिओ व्हायरल केले. मौलाना तौकीर रजा याने व्हिडिओ जारी करून शुक्रवारी सर्वांनी नमाजाच्या नंतर एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यामुळे प्रचंड मोठा जमाव बरेलीत जमला. नमाज्यानंतर डीएम ऑफिसला निवेदन देण्याच्या निमित्ताने मोठा मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये मौलाना तौकीर रजा याचे समर्थक हत्यारे घेऊन घुसले होते. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी केलेल्या लाठीमारानंतर अनेकांकडून जिवंत काडतुसे, पिस्तुले, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, ब्लेड्स, चाकू सुरे जप्त केले. 39 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

    मौलाना तौकीर रजा याला त्याच्या 10 समर्थकांसह अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून त्यांची कोठडीमध्ये रवानगी केली. या सगळ्यांचा दंगल घडवायचा डाव होता, अशी माहिती बरेलीची डीएम अविनाश सिंह आणि एस एस पी अनुराग आर्य यांनी दिली.

    अटक केलेल्यांची नावे अशी दंगल घडविण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्यांची नावे अशी :

    मौलाना तौकीर रजा, सरफराज उर्फ सलीम, झहीरुद्दीन, असीम अहमद, मोहम्मद शरीफ, मोहम्मद अमीर मोहम्मद जायेद, मोहम्मद सरफराज.

    violence in Bareilly, Bareilly SSP Anurag Arya

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    याला म्हणतात, बिन बडबडीचा तडाखा; BRICS सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा न्यूयॉर्कमध्ये धमाका!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींवर वाराणसी कोर्टात खटला चालणार; अमेरिकेत म्हटले होते- शिखांना भारतात पगडी-कडा घालण्याचा अधिकार आहे?

    Modi : बिहारच्या तब्ब्बल 75 लाख महिलांना 10-10 हजार मिळाले; मोदींच्या हस्ते महिला रोजगार योजनेचा शुभारंभ