तोंडावर कापड बांधलेल्या काही लोकांनी दगडफेक सुरू केली आणि त्यानंतर गोळीबारही झाला.
विशेष प्रतिनिधी
इंदूर : मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व 230 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान राज्यात हिंसाचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. आधी इंदूरमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला आणि आता मुरैना येथे दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. Violence during polling in Madhya Pradesh clashes between two groups in Dimani
इंदूरमध्ये गुरुवारी रात्री वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मुरैना येथील दिमानी विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्राजवळ दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची बातमी आहे. यादरम्यान गोळीबारही झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या हिंसाचारात एक जण जखमी झाला आहे.
कडेकोट बंदोबस्तात मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांसाठी आज (17 नोव्हेंबर) मतदान होत आहे. दरम्यान, मुरैना येथील दिमाणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 148 वर सकाळी दोन्ही पक्षांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी तोंडावर कापड बांधलेल्या काही लोकांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
हिंसाचारानंतर मतदान केंद्राभोवती चेंगराचेंगरी झाली. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत हल्लेखोरांचा पाठलाग करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर बूथवरील सुरक्षा वाढवण्यात आली.