• Download App
    West Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार ; भाजप खासदाराच्या कार्यक्रमात जाळपोळ आणि दगडफेक Violence again in West Bengal Arson and stone pelting at BJP MP event

    West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार ; भाजप खासदाराच्या कार्यक्रमात जाळपोळ आणि दगडफेक

    (संग्रहित)

    शोभायात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली.

    विशेष प्रतिनिधी

    West Bengal Hooghly Violence:  पश्चिम बंगालमध्ये आज (२ एप्रिल) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. हुगळीत भाजपच्या शोभा यात्रेदरम्यान जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्या रिशडामध्ये झालेल्या कार्यक्रमात गदारोळ झाला आहे. हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. Violence again in West Bengal Arson and stone pelting at BJP MP event

    हिंसाचार भडकल्यानंतर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलीप घोष यांना सुरक्षित स्थळी नेले. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप खासदार दिलीप घोष म्हणाले की, शोभा यात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली. हावडा हिंसाचारानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. आताही दगडफेक होत असून वाहनांची तोडफोड केली जात आहे.

    यापूर्वी हावडा येथे हिंसाचार झाला होता –

    यापूर्वी रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा शहरातील काझीपाडा भागात हिंसाचार झाला होता. ही मिरवणूक काझीपाडा परिसरातून जात असताना ही घटना घडली. हिंसाचारात अनेक दुकाने आणि ऑटो-रिक्षांची तोडफोड करण्यात आली, तर पोलिसांच्या काही वाहनांसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या. हावडा येथील हिंसाचारात भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दल यासारख्या  संघटना शस्त्रांसह सामील असल्याचा आरोप मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केला होता.

    पोलिसांवर पुन्हा दगडफेक  –

    मुख्यमत्री ममता बॅनर्जींनी परिसरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र यानंतर शुक्रवारी दुपारीही काझीपाडा परिसरात अज्ञातांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लोकांना पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला आणि दगडफेकीत तीन पोलिस जखमी झाले. गुरुवारपासून हिंसाचारप्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आली आहे.

    Violence again in West Bengal Arson and stone pelting at BJP MP event

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य