• Download App
    मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; अतिरेकी गटाशी झालेल्या चकमकीत एक कमांडो शहीद, पाच जखमीViolence again in Manipur One commando martyred five injured in encounter with militant groups

    मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; अतिरेकी गटाशी झालेल्या चकमकीत एक कमांडो शहीद, पाच जखमी

    (संग्रहित छायाचित्र)

    मणिपूर पोलिसांना काही अतिरेकी डोंगराळ भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती.

    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ: मणिपूरच्या ट्रोंगलाबी बिष्णुपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि संशयित कुकी अतिरेकी यांच्यात चकमक घडली. या हिंसाचारात हिरेन नावाच्या पोलीस कमांडोचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. Violence again in Manipur One commando martyred five injured in encounter with militant groups

    ही घटना इंफाळच्या पुखोन भागात घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे अतिरेकी गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर पोलिसांना काही अतिरेकी डोंगराळ भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मणिपूर पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा या भागात पाठवला आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. बुधवारी निमलष्करी दलाच्या एका तुकडीवर झालेल्या गोळीबारात आसाम रायफल्सचा एक जवान जखमी झाल्यानंतर हा हल्ला झाला आहे.

    Violence again in Manipur One commando martyred five injured in encounter with militant groups

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!