वृत्तसंस्था
जोधपूर : राजस्थानात जोधपुर आदल्या दिवशीपासून भडकलेला हिंसाचार आजच्या दिवशी देखील भडकलेलाच राहिला अवघ्या बारा तासांमध्ये 3 वेळा हिंसाचार होऊन तब्बल 10 ठिकाणी संचार बंदी लावावी लागेल एका ठिकाणी आमदाराचे घर जमावाने पेटविले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या हिंसाचाराचा रिपोर्ट मागवला आहे. भाजपा आमदार सूर्यकांत व्यास यांच्या घरासमोर जमावाने वाहनांची पेटवापेटवी केली. Violence 3 times in 12 hours in Jodhpur on Eid
ईदच्या दिवशी जोधपूरच्या जालोरी गेट परिसरामध्ये प्रचंड जमाव जमला आणि त्याने तोडफोड हिंसाचार माजवला अनेक ठिकाणी पेटवापेटवी केली तलवारबाजी केली या हिंसाचारात 4 जण जखमी झाले, तर 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर काही ठिकाणी लोकांनी हनुमान चालीसा चे वाचन सुरू केले आहे.
जोधपूर शहराच्या उदयमंदिर, नागोरी गेट, सदर कोतवाली, सदर बाजार, सुरसागर, सरदारपुरा, खांडाफलसा, प्रतापनगर, देवनगर,
प्रतापनगर सदर या परिसरामध्ये पोलिसांनी कर्फ्यू लावला आहे.
सोमवारी रात्री ईद साठी झेंडे लावण्याच्या मुद्द्यावरून जोरदार दगडफेक झाली होती यामध्ये चार पोलीस जखमी झाले होते जालोरी गेट परिसरामध्ये सोमवारी रात्री देखील मोठा जमाव जमला होता त्यांनी काही गाड्यांना आग लावून पेटवापेटवी केली. आज इच्छा दिवशी देखील याच जालोरी गेट परिसरात मोठ्या जमावाने पेटवापेटवी आणि दगडफेक करत अनेकांना जखमी केले. यात 12 पोलिस जखमी झाले आहेत. शहरात दहा ठिकाणी कर्फ्यु लावण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त नवज्योती गोगई यांनी दिली. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
Violence 3 times in 12 hours in Jodhpur on Eid
महत्वाच्या बातम्या