वृत्तसंस्था
लडाख : लडाखमध्ये चिनी सैन्याकडूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग झाला आहे. यातून चीनच्या सैन्याने भारत – चीन द्विपक्षीय कराराचा भंग केला आहे, अशा स्पष्ट शब्दांमध्ये भारतीय लष्कराच्या प्रतिनिधी मंडळाने चीनच्या प्रतिनिधी मंडळाला सुनावले आहे. Violation of the Line of Control by Chinese troops in Ladakh; In the thirteenth round of discussions, Indian military officials spoke
दोन्ही देशातल्या शिष्टमंडळाची चर्चेची तेरावी फेरी चीनच्या माडलो तळावर झाली. त्यावेळी भारतीय प्रतिनिधी मंडळाने गेल्या अठरा महिन्यातील लडाख मधल्या चीनच्या घुसखोरीवर नेमकेपणाने बोट ठेवले. कोणत्याही स्थितीत भारतीय लष्कर चीनच्या सैन्याला आपल्या हद्दीत घुसून देणार नाही.
प्रसंगी संघर्षाला देखील भारत तयार आहे. चीनने आपले सैन्य लडाख मधल्या सर्व फॉरवर्ड पोस्टवरून माघारी घेतल्याखेरीज परिसरामध्ये कायमस्वरूपी शांतता नांदणार नाही, अशी आग्रही भूमिका भारतीय शिष्टमंडळाने मांडली. चिनी सैन्य दलाचे प्रत्येक युक्तिवाद भारतीय लष्करी शिष्टमंडळाने खोडून काढले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांच्या सर्वोच्च नेतृत्वाने केलेल्या करारानुसार मान्य करण्यात आली आहे. तिचा भंग करणे हा त्या कराराचाच भंग असल्याचे भारतीय शिष्टमंडळाने चिनी शिष्टमंडळाला सुनावले.
लडाख मधल्या हिंसक संघर्षात भारताच्या 20 जवानांना प्राण गमवावे लागले. परंतु, चिनी सैन्याचे सुमारे 40 सैनिक या संघर्षात मारले गेले. त्यावेळी झालेला संघर्ष पुन्हा उद्भवू नये, यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर शिष्टमंडळाच्या चर्चा सुरू आहेत. यातल्या चर्चेची तेरावी फेरी माडलो येथे झाली. यानंतर भविष्यात आणखीही चर्चेच्या फेऱ्या होतील, असे भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
Violation of the Line of Control by Chinese troops in Ladakh; In the thirteenth round of discussions, Indian military officials spoke
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू