• Download App
    विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ Vinesh Phogat returns Khel Ratna-Arjuna Award;

    विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केले आहेत. शनिवारी (30 डिसेंबर) विनेश हा पुरस्कार परत करण्यासाठी दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयात जात होती. या आधीही पोलिसांनी तिला रोखले. त्यानंतर विनेशने कर्तव्य पथावर पुरस्कार जमिनीवर ठेवला आणि हात जोडून परतली.

    विनेशने 3 दिवसांपूर्वी पीएम मोदींना 2 पानांचे पत्र लिहिले होते. ज्यामध्ये महिला कुस्तीपटूंना न्याय मिळत नसल्याचे म्हटले होते. पुरस्कार परत करताना विनेश म्हणाली की, मी न्यायासाठी येथे आले आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

    बजरंग पुनियाने विनेशच्या पुरस्कार परतीचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहेत.”


    कुस्तीपटूंचे आंदोलन संपवण्याची घोषणा; साक्षी-विनेश आणि बजरंग म्हणाले- आता लढाई रस्त्यावर नाही, तर कोर्टात लढू


    विनेशच्या आधी बजरंग पुनियाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्यांनी हा पुरस्कार पंतप्रधानांच्या घराबाहेरील फूटपाथवर ठेवला होता.

    बृजभूषण यांचे जवळचे सहकारी संजय सिंग यांची WFIच्या नवीन कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर त्याच दिवशी साक्षी मलिकने तिचे शूज टेबलावर ठेवले आणि कुस्तीतून निवृत्त झाली.

    हे सर्व कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघावरील ब्रिजभूषण आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या वर्चस्वाला विरोध करत आहेत. मात्र, सरकारने संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील WFI च्या कार्यकारी समितीला निलंबित केले आहे.

    ज्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने WFI च्या ऑपरेशनसाठी एडहॉक समिती स्थापन केली आहे. ज्याचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा होते. त्यांच्यासोबत एमएम सौम्या आणि मंजुषा कंवर यांना सदस्य करण्यात आले आहे.

    Vinesh Phogat returns Khel Ratna-Arjuna Award

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले