वृत्तसंस्था
पॅरिस : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिंपिक सुवर्णपदकाच्या लढतीतून अपात्र झाल्यानंतर संपूर्ण भारतात निराशा जनक वातावरण पसरले. स्वतः विनेश आजारी पडून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. भारतातून संतापाची लाट उसळली. विनेश अपात्रता प्रकरणावर भारतात राजकारण रंगले. परंतु, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी पॅरिस मधल्या ऑलिंपिक हॉस्पिटलमध्ये जाऊन विनेश फोगाटची भेट घेतली. तिचे मनोधैर्य वाढविले. Vinesh Phogat disqualification
भारतीय ऑलिंपिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे विनेशच्या अपात्रते विरोधात तक्रार दाखल केली आहे. याची माहिती पी. टी. उषा यांनीच पॅरिस ऑलिंपिक नगरीत पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी भारतीय टीमचे डॉक्टर दिनशॉ पौडीवाला हे देखील उपस्थित होते. त्यांनी विनेशच्या परफॉर्मन्सचा आणि तिच्या अपात्रते संदर्भात वैद्यकीय दृष्टीने आढावा घेतला.
विनेश फोगाटच्या अपात्रतेवर भारतीय दलाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पौडीवाला म्हणाले, विनेशच्या पोषणतज्ञांना असे वाटले की ती दिवसभरात 1.5 किलोग्रॅम घेते. ती बाउट्ससाठी पुरेशी ऊर्जा देते. काहीवेळा स्पर्धेनंतर वजन वाढण्याचे कारण असते. विनेशच्या तीन बाऊट्स होत्या, त्यामुळे कोणतेही निर्जलीकरण, तिला काही प्रमाणात पाणी देणे आवश्यक होते सर्व प्रयत्न करूनही, आम्हाला आढळले की विनेशचे वजन तिच्या 50 किलो वजनाच्या श्रेणीपेक्षा जास्त आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून, विनेशला डिहायड्रेशन टाळण्यासाठी इंट्राव्हेनस फ्लुइड्स देण्यात आले. तिचे कपडे हलके वजनाचे ठेवण्यात आले असे केस कापले परंतु वजन कमी होऊ शकले नाही.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या, विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. मी विनेशला थोड्या वेळापूर्वी ऑलिम्पिक ग्राम पॉलीक्लिनिकमध्ये भेटले आणि तिचे मनोधैर्य खचले होते. भारतीय ऑलिम्पिक संघटना तिच्या पाठीशी पूर्ण उभी राहिल्याचे आश्वासन दिले.
Vinesh Phogat disqualification
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या मुक्ती संग्रामाचे “नोबेल प्रलाप”; वंगबंधू म्युजियम + इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आगीत खाक!!
- Dhirendra Shastri : बांगलादेश हिंसाचारावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- Sheikh Hasina : शेख हसीना यांना आणखी एक धक्का, ब्रिटननंतर अमेरिकेनेही त्यांना आश्रय नाकारला!
- CM Eknath Shinde : प्रत्येक गावात मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ कार्यान्वित करा – मुख्यमंत्री शिंदे