• Download App
    2018 च्या ट्विट बद्दल 2024 मध्ये विक्रांत मेस्सीला उपरती; हिंदूंना दुखावण्याचा हेतू नसल्याचे सांगून मागितली माफी!!|Vikrant Messi in 2024 about 2018 tweets; Apologized saying that there was no intention to hurt Hindus!!

    2018 च्या ट्विट बद्दल 2024 मध्ये विक्रांत मेस्सीला उपरती; हिंदूंना दुखावण्याचा हेतू नसल्याचे सांगून मागितली माफी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2018 मध्ये हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावून त्यांचा अपमान करणाऱ्या ट्वीट बद्दल अभिनेता विक्रांत मेस्सीला उपरती होऊन त्याने 2024 मध्ये समाजाची माफी मागितली आहे.Vikrant Messi in 2024 about 2018 tweets; Apologized saying that there was no intention to hurt Hindus!!

    2018 मध्ये विक्रांत मेस्सीने एक कार्टून शेअर करत हिंदू समाजाला “हाफ बेक्ड पोटॅटो आणि हाफ बेक्ड नॅशनॅलिस्ट” असे हिणवले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध सोशल मीडियामध्ये संताप उसळला होता. परंतु त्यावेळी त्याने माफी मागितली नव्हती. परंतु नंतर त्याला कायद्याचा दणका बसला. कोर्टात केस सुरू झाली. त्यामुळे आता विक्रांत मेस्सीने 2018 मधल्या त्या ट्वीट बद्दल हिंदू समाजाची माफी मागितली आहे.



    माझा हिंदू समाजाला कोणताही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला जे म्हणायचे होते, ते वर्तमानपत्रातले एक व्यंगचित्र न जोडताही शांतपणे सांगता आले असते. परंतु ते मी केले नाही. त्यामुळे समाज दुखावला. त्याबद्दल मी अत्यंत नम्रपणे हात जोडून माफी मागतो. मी सर्व धर्मांच्या श्रद्धांचा आदर करतो. मी चूक केली तर त्यावर चिंतनही करून माफी मागतो, असे विक्रांत मेस्सीने नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    पण विक्रांत मेस्सीच्या माफीच्या ट्वीट बरोबरच विक्रांत मेस्सी आणि त्याचा वकील यांचा एक सोशल मीडिया संवाद देखील व्हायरल झाला आहे. त्यात विक्रांत मेस्सी आपल्या चुकीची कबुली देताना आढळला आहे. याचा अर्थ दाखल झालेल्या खटल्याच्या दणक्याच्या भीतीने विक्रांत मेस्सीने माफी मागितली आहे, हेच सिद्ध होते.

    Vikrant Messi in 2024 about 2018 tweets; Apologized saying that there was no intention to hurt Hindus!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!