विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना थेट देशद्रोही म्हणणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय एका झटक्यात कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आले आणि त्यांना माघार घ्यावी लागली. पण ही माघार घेताना वडेट्टीवार यांनी माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांचा हवाला दिला. Vijay Vadettiwar who called Ujjwal Nikam a traitor is in trouble
ज्येष्ठ सरकारी वकील आणि उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम हे देशद्रोही असल्याचा खळबळजनक आरोप विजय वडेट्टीवार यांनी काल केला. पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना मुंबई हल्ल्याच्या वेळी लागलेली गोळी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती, तर संघाच्या एका पदाधिकाऱ्याची होती आणि त्याला वाचवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी सगळी वकिली ताकद पणाला लावली होती. त्यामुळे ते देशद्रोही ठरतात, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता.
परंतु त्यानंतर सगळीकडूनच वडेट्टीवार यांच्यावर तुफानी हल्ला करण्यात आला. शिवसेना, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी वडेट्टीवार यांचे वाभाडे काढले. उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली. निवडणूक आयोगात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार झाली. भाजपने मुंबईत त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला.
या पार्श्वभूमीवर सगळीकडून अडचणीत सापडलेल्या विजय वडेट्टीवार यांनी आपणच केलेल्या विधानापासून माघार घेतली. पण ही माघार घेताना त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला दिला. हेमंत करकरे यांना लागलेल्या गोळी संदर्भात केलेले वक्तव्य आपले स्वतःचे नाही, तर मुश्रीफ यांनी ते पुस्तकात लिहिले आहे. ते फक्त मी पत्रकारांना सांगितले, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. पण त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्यासारखे वरिष्ठ वकील कसे काय देशद्रोही ठरतात??, याचा खुलासा मात्र वडेट्टीवार यांनी केला नाही.
Vijay Vadettiwar who called Ujjwal Nikam a traitor is in trouble
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे नेते पाहताहेत 2004 चे स्वप्न, पण त्यांना 1969 पाहायला नाही लागले म्हणजे मिळवलीन!!
- 4 जून नंतर काँग्रेसमध्ये पुन्हा पडणार फूट! प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा
- प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कॅण्डल : देवेगौडा पुत्र आणि प्रज्ज्वल पिता एचडी रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात!!
- कांद्यावरची निर्यात बंदी उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच; फडणवीसांचा निशाणा!!