• Download App
    Vijay Rupani विजय रुपानींचा DNA जुळला; जाणून घ्या,

    Vijay Rupani : विजय रुपानींचा DNA जुळला; जाणून घ्या, अंतिम संस्कार कधी अन् कुठे होणार?

    Vijay Rupani

    माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघातात निधन झाले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद – Vijay Rupani  गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची आज रविवार १५ जून रोजी डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे. विजय रुपानी एअर इंडियाच्या AI171 विमानामध्ये होते, जे १२ जून रोजी दुपारी १:३९ वाजता अहमदाबादमध्ये कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. विजय रुपानी यांचाही यामध्ये समावेश आहे. अपघातात बळी पडलेले विमान एअर इंडियाचे बोईंग 787-0 ड्रीमलाइनर होते.Vijay Rupani



    गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले, माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघातात निधन झाले. आज सकाळी ११:१० वाजता त्यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांनी अनेक वर्षे राज्यातील जनतेची सेवा केली. विजय रुपानी यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहे. १६ जून रोजी राजकोटमध्ये त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. राजकोटमधील विजय रुपानी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ज्या ठिकाणी ठेवले जाईल त्या ठिकाणीही तयारी सुरू झाली आहे.

    भाजप आमदार रीता पटेल म्हणाल्या, “आमचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. आता त्यांचे पार्थिव राजकोट येथील त्यांच्या कुटुंबाकडे नेले जाईल, त्यानंतर उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातमधील रहिवाशांसाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला जाईल, तेथून ते हेलिकॉप्टरने राजकोटला नेले जाईल

    Vijay Rupanis DNA matched Know when and where the last rites will be performed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nyoma Air Base : लडाखमधील चीन सीमेजवळील न्योमा हवाई तळ कार्यान्वित; 218 कोटी खर्चून 13,000 फूट उंचीवर उभारला

    बिहारच्या निवडणुकीत तावडे + फडणवीस + शिंदे हे मराठी नेते चमकले; पण एकटे अजितदादा घसरले!!

    Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाने मुकुल रॉय यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले; पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत निर्णय