• Download App
    विजय मल्याचे शेअर्स विकून होणार ६,२०० कोटी रुपयांची वसुली|Vijay Mallya's shares will be sold for Rs 6,200 crore

    विजय मल्याचे शेअर्स विकून होणार ६,२०० कोटी रुपयांची वसुली

    देशातील अनेक बॅँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या कर्ज बुडव्या विजय मल्याकडून वसुली करण्यासाठी त्याचे शेअर्स विकले जाणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑ फ इंडिया (एसबीआय) च्या नेतृत्वाखालील बँकांचा एक गट कजार्ची वसुली करण्यासाठी आपल्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकेल. याद्वारे सुमारे 6,200 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. हे कर्ज विजय मल्ल्याने त्यांच्या विमान कंपनी किंगफिशरसाठी घेतले होते.Vijay Mallya’s shares will be sold for Rs 6,200 crore


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील अनेक बॅँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या कर्ज बुडव्या विजय मल्याकडून वसुली करण्यासाठी त्याचे शेअर्स विकले जाणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या नेतृत्वाखालील बँकांचा एक गट कजार्ची वसुली करण्यासाठी आपल्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकेल.

    याद्वारे सुमारे 6,200 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. हे कर्ज विजय मल्ल्याने त्यांच्या विमान कंपनी किंगफिशरसाठी घेतले होते.23 जून रोजी होणाऱ्या या लिलावात एसबीआयमार्फत युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅकडोनाल्ड होल्डिंग्स लिमिटेडचे शेअर्स विकले जातील.



    जर शेअर विक्री यशस्वी झाली तर किंगफिशर प्रकरणात बँकांची ही पहिली मोठी वसुली असेल.शेअर्सची ही विक्री डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, बंगळुुरूअंतर्गत केली जाईल. वसुली अधिकारी 6,203 कोटी रुपयांसह खर्च आणि 25 जून 2013 पासून रिकव्हरीच्या तारखेपर्यंत 11.5 टक्के व्याजही जोडून वसूल करेल.

    या महिन्याच्या सुरुवातीला पीएमएलए कोटार्ने बँकांना माल्याची प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी विकण्याची परवानगी दिली. बँकांनी म्हटले की, प्रॉपर्टी आणि इतर संपत्ती विकून बँक आपला काही पैसा वसूल करु शकते.

    23 जून रोजी, रिकव्हरी ऑफिसर ब्लॉक डील अंतर्गत 4.13 कोटी युनायटेड ब्रूव्हरीज, 25.02 लाख युनायटेड स्पिरिट्स आणि 2.2 दशलक्ष मॅकडोनाल्ड होल्डिंगची विक्री करेल. अहवालानुसार, ब्लॉक डील अंतर्गत शेअर्स विकले गेले नाहीत तर ते 24 जूनपासून मोठ्या प्रमाणात किंवा रिटेल मोडद्वारे विकले जातील.

    आर्थिक संकटामुळे मल्ल्याची विमान कंपनी किंगफिशर 20 ऑक्टोबर 2012 पासून उड्डाण करू शकली नाही. कर्ज न भरल्यामुळे आणि बँकांना फसवल्याप्रकरणी विजय मल्ल्याला जानेवारी 2019 मध्ये एक फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मल्ल्या 2 मार्च 2016 रोजी भारत सोडून गेला होता.

    विजय मल्ल्या यांनी 17 बँकांकडून सुमारे 9 हजार कोटी रुपये आणि त्यांचे व्याज अद्याप दिलेले नाही. यात पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, फेडरल बँक, अक्सिस बँकेसह एसबीआयचा समावेश आहे.

    Vijay Mallya’s shares will be sold for Rs 6,200 crore

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र