• Download App
    उपराष्ट्रपती निवडणूक : ममतांचा राजकीय मूड जगदीप धनगडांच्या बाजूने नाही!!; 21 जुलैला ठरविणार भूमिका |Vice President Election : Mamata's political mood is not in favor of Jagdeep Dhangad!!; The role will be decided on July 21

    उपराष्ट्रपती निवडणूक : ममतांचा राजकीय मूड जगदीप धनगडांच्या बाजूने नाही!!; 21 जुलैला ठरविणार भूमिका

    वृत्तसंस्था

    कोलकाता :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा राजकीय मूड भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांच्या बाजूने नाही. ममतांनी आगामी संसद अधिवेशन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची 21 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. त्या दिवशी संध्याकाळी ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे.Vice President Election : Mamata’s political mood is not in favor of Jagdeep Dhangad!!; The role will be decided on July 21

    सर्वसाधारणपणे ज्या राज्याच्या राज्यपालांना वरिष्ठ पदावर नेमणुकीची अथवा निवडण्याची संधी येते, त्यावेळी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना पाठिंबा देतात. अर्थात अशी प्रथा आहे. तसा नियम नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि जगदीश धनगड यांचे राजकीय अहि नकुलाचे नाते लक्षात घेता त्या जगदीप धनगड यांना पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नाहीत.



    जगदीप धनगड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. जगदीप धनकड आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात वारंवार मतभेद झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या कृतीवर टीका देखील करण्यात आल्या आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

    ममतांचा भाजपवर निशाणा 

    ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला होता. द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यापूर्वी भाजपने विरोधी पक्षांशी बोलून त्यांच्याशी सल्लामसलत केली असती, तर त्यासर्वानुमते उमेदवार असू शकल्या असत्या, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

    Vice President Election : Mamata’s political mood is not in favor of Jagdeep Dhangad!!; The role will be decided on July 21

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य