वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Vice President Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड (७३ वर्षे) यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना अस्वस्थता आणि छातीत दुखण्याची तक्रार होती. त्यानंतर, रविवारी पहाटे २ वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.Vice President Dhankhar
पीटीआयच्या वृत्तानुसार, ते सध्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्यमंत्री जेपी नड्डा स्वतः एम्समध्ये त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एम्स रुग्णालयात भेट दिली आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड (७३) यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी X वर लिहिले – एम्समध्ये गेलो आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही आज सकाळी एम्सला भेट दिली आणि धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, ते सध्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Vice President Dhankhar admitted to AIIMS; complaining of discomfort and chest pain; PM Modi visits him
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde पंकजा मुंडे “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून का झाला वादविवाद??; कुणी केला त्यांचा घात??
- रोहित शर्माच्या कॅप्टन्स इनिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले भारताचे नाव!!
- Suresh Raina : सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची हत्या करणारा असद पोलिस चकमकीत ठार
- Goa Police : गोवा पोलिसांची मोठी कारवाई, ११ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त