वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशातल्या मोजक्या पाणबुडीविरोधी युध्द कौशल्याचे विशेषज्ञांपैकी एक व्हाइस ऍडमिरल राजेश पेंढारकर यांनी आज नौदलाच्या ऑपरेशन्स विभागाच्या महासंचालकपदाची (Director General Naval Operations) सूत्रे हाती घेतली. संपूर्ण देशातील नौदलाच्या कार्यवाही (ऑपरेशन्स) क्षेत्राचे ते प्रमुख असतील. Vice Admiral Rajesh Pendharkar, AVSM, VSM has assumed charge as Director General Naval Operations, earlier today.
व्हाइस ऍडमिरल राजेश पेंढारकर हे खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी. त्यांनी नौदलाचे पदवीप्रशिक्षण अमेरिकेतील नौदल अकादमीतून पूर्ण केले आणि जानेवारी १९८७ मध्ये त्यांना भारतीय नौदलात कमिशन मिळाले.
आपल्या सेवाकाळात त्यांनी आयएनएस शुभ्रदा, आयएनएस गंगा, आयएनएस डुंगरी, आयएनएस कृपाण, आयएनएस मैसूर, आयएनएस शिवालिक या युद्धनौकांचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे. तसेच भारताची विमानवाहू नौका आयएनएस विराटवरही सेवा बजावली आहे.
पाणबुडीविरोधी युध्द कौशल्याचे ते विशेषज्ञ मानले जातात. सध्या महाराष्ट्र नौदल विभागाच्या फ्लॅग ऑफिसर या पदावर होते. आज त्यांनी नौदलाच्या ऑपरेशन्स विभागाच्या महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतली.