विशेष प्रतिनिधी
बंगळूर : ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री अभिनया शरदे जयंती ऊर्फ जयंती (वय ७६) यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. कन्नड, तेलुगू व तमीळ भाषेतील चित्रपटात त्यांनी काम केले होते. जयंती या ‘लाल लाल बंगला’ व ‘तुमसे अच्छा कौन है’ या हिंदी चित्रपटांमध्ये झळकल्या. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांच्याबरोबरील त्यांचे अनेक चित्रपट गाजले. Veteran Kannada actress Jayanti, who made history on the silver screen, has passed away
पाच दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत जयंती यांनी ५०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. १९६० ते ८० च्या काळात कन्नड चित्रपटसृष्टीतील त्या प्रमुख अभिनेत्रींपैकी एक होत्या. बल्लारी येथे १९४५मध्ये जन्मलेल्या जयंती यांनी १९६३मध्ये वाय. आर स्वामी यांच्या ‘जेनू गुडू’ या चित्रपटांतून पदार्पण केले. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर त्यांचा ‘चंदावल्लीया थोटा’ हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरला. डॉ. राजकुमार यांच्याबरोबर त्यांची जोडी पडद्यावर गाजली. तब्बल ३० चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. कन्नड राज्य चित्रपट पुरस्काराच्या त्या सातवेळा मानकरी ठरल्या होत्या.
Veteran Kannada actress Jayanti, who made history on the silver screen, has passed away
महत्त्वाच्या बातम्या
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे येणार, समतोलासाठी उपयुक्त बाब
- १५५ किलोमीटर वेगाने घोंघावणाऱ्या ‘इन-फा’ वादळाचा चीनला तडाखा, शेकडो विमाने रद्द
- अबुधाबीतील भारतीय वंशाचे उद्योजक युसुफअली यांच्या शिरपेचात मानाचा तुरा
- सप्टेंबरच्या अखेरपर्यंत लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार – डॉ. गुलेरिया यांचा अंदाज