• Download App
    Very old Lok Sabha speeches, rare and historical events can now be viewed easily!

    लोकसभेतील अतिशय जुनी भाषणं, दुर्मिळ आणि ऐतिहासिक घडामोडी आता सहज पाहता येणार!

    • लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे होणार शक्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभा हे भारतीय संसदेचं कनिष्ठ आणि महत्त्वपूर्ण असे सभागृह आहे.. या लोकसभेत झालेलं प्रत्येक भाषण, उपस्थित केलेला प्रश्न, त्याला मिळालेलं उत्तर, या सगळ्या मधून प्रतिनिधिक स्वरूपात जनतेचा आवाज समोर येत असतो.. त्यामुळे लोकसभेतील या भाषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.. Very old Lok Sabha speeches, rare and historical events can now be viewed easily!

    सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताच्या काळातल्या सगळ्या लोकसभेतील घडामोडी आपल्याला एका क्लिकवर बघायला मिळतात.. मात्र आधीच्या दशकातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी, तत्कालीन पंतप्रधान राष्ट्रपती परदेशीय उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्री, खासदार यांची भाषण आतापर्यंत कुठेही सोशल मीडियावर उपलब्ध नव्हती..

    मात्र सध्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आहे. 90 च्या दशकातील लोकसभेतील महत्वपूर्ण घडामोडी, तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती, परदेशीयं उच्चपदस्थ अधिकारी , ज्येष्ठ राजकारणी, लोकसभेतील इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी या सगळ्यां घटना त्यांनी youtube च्या माध्यमातून सर्वसामान्यांसमोर आणल्या आहेत..



     

    या सगळ्या घडामोडींच्या स्टोअर रूम मध्ये धुळखात पडलेल्या कॅसेट्सचं डिजिटलायझेशन होऊन Parliament of India audio visual archive या यूट्यूब चॅनल वर पहिल्यांदीच हे व्हिडिओज अपलोड करण्यात येत आहेत..
    आतापर्यंत या चॅनल वर 943 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत… येत्या काळात आणखी जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनल वर अपलोड करण्यात येणार आहेत..

    ओम बिर्ला यांच्या पुढाकारामुळे सर्वसामान्यांना एका क्लिकवर हा सगळा लोकसभेतील संग्रहित आणि मौल्यवान खजिना उपलब्ध झाला आहे.. या सगळ्यांचा फायदा विशेष करून स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक आणि राजकारणात रुची असणाऱ्यांना होणार आहे ..

    भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचा कार्यकाळ केवळ सात महिने तेरा दिवस होता.. मात्र त्यावेळी त्यांनी दिलेली लोकसभेतील भाषण आत्ताच्या या नवीन youtube चॅनल वर उपलब्ध असणार आहेत..

    यामध्ये भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे काही भाषण , तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 183 भाषण , पी व्ही नरसिंहराव यांची 12 ही त्यांच्या कार्यकाळातली भाषण या चॅनल वर अपलोड करण्यात आली आहेत..
    याशिवाय ज्येष्ठ राजकारणी मुलायम सिंग यादव, आत्ताचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अगदीच तरुणपणातला 1998 मधला संस्कृत भाषेतून शपथ घेतानाचा व्हिडिओ या चॅनल वर उपलब्ध आहे .. तसंच तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे देखील व्हिडिओज या चॅनल वर बघता येणार आहेत..1992 पूर्वी लोकसभेत कुठलाही प्रकारचं रेकॉर्डिंग केल्या जात नसत… 1992 मध्ये दूरदर्शन ने लोकसभेतील काही मोजक्या घडामोडीनच प्रक्षेपण करणं सुरू केलं.. यामध्ये मुख्यत्वे करून अर्थसंकल्पाचं सादरीकरण हे होतं..

    या सगळ्या डिजिटलायझेशनचं काम फेब्रुवारी महिन्यात सुरू झालं होतं.. लोकसभेची सगळी विश्वासार्हता आणि गोपनीयता पाळून हे सगळं काम केल्या गेलं आहे..

    Very old Lok Sabha speeches, rare and historical events can now be viewed easily!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य