विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे 22 जानेवारीला होत असताना देशात आणि प्रदेशात प्रचंड उत्साह आहे. 550 वर्षांच्या संघर्षानंतर होणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्याची देशात आणि परदेशात जोरदार तयारी सुरू आहे. देशातल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रणही गेले आहे. Vengeance of the Congress government in Karnataka
पण राम मंदिराच्या विरोधकांनी आता वेगवेगळ्या मार्गांनी आपले डोकेही वर काढले आहे. कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने सूडबुद्धी दाखवत 1992 च्या कारसेवकांविरुद्धचे जुने खटले उकरून काढले आहेत. 1992 मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवेत सामील झाल्याबद्दल कर्नाटकमधल्या हुबळीचे कारसेवक श्रीकांत पुजारी यांना कर्नाटक सरकारने काल अटक केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अटकेचे आज समर्थन केले.
वास्तविक सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद आणि राम मंदिरासंदर्भातले सगळे जुने खटले निकाली काढले. त्यानंतरच राम मंदिराचे काम पूर्ण होत असून तिथे श्रीराम लल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु, या आनंद सोहळ्याला डाग लावण्यासाठीच कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने 1992 च्या कारसेवकांविरुद्ध जुने खटले उकरून काढण्याचे काम चालवले आहे. यातली पहिली अटक श्रीनाथ पुजारी या कारसेवकांना झाली आहे.
राज्यातल्या सगळ्या जुन्या खटल्यांचा निपटारा करण्याचे आदेश आम्ही काढले आहेत. ज्यांनी गुन्हे केले त्यांना मोकळे सोडण्याचे कारण नाही, असा दावा करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी श्रीनाथ पुजारी यांच्या अटकेचे समर्थन केले आहे. परंतु कर्नाटकात आणि संपूर्ण देशात मात्र श्रीनाथ पुजारी यांच्या अटकेचा पूर्ण निषेध होतो आहे. जो खटला पूर्णपणे संपुष्टात आला आहे आणि ज्यावेळी भव्य दिव्य राम मंदिर उभे आहे, त्यावेळी केवळ सूडबुद्धीने अटकेची कारवाई कर्नाटक सरकारने केल्याचे टीकास्त्र भाजपच्या अनेक नेत्यांनी सोडले आहे.
Vengeance of the Congress government in Karnataka
महत्वाच्या बातम्या
- नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच LPG सिलिंडरच्या किमतीत कपात
- शुभमन गिलने वर्षभरापूर्वी कागदावर लक्ष्य लिहून ठेवले होते, फोटो शेअर केला आणि …
- NIAने परदेशात भारतीय दूतावासांवर हल्ला करणाऱ्या खलिस्तानींची ओळख पटवली
- 2024 : रामाच्या जयघोषात नववर्षाची सुरवात आनंददायी; मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा!!