विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Vedamurti Devavrat Rekhe, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि कठोर साधनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असे या तरुणाचे नाव असून, त्याने काशी (वाराणसी) येथे अत्यंत कठीण मानले जाणारे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले आहे. त्याच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे.Vedamurti Devavrat Rekhe,
वेदमूर्ती देवव्रत रेखे याने काशीमध्ये राहून शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील तब्बल 2000 मंत्रांचा समावेश असलेले ‘दंडक्रम पारायण’ अवघ्या 50 दिवसांत पूर्ण केले आहे. ही साधना कोणत्याही व्यत्ययाशिवाय (अखंड) पूर्ण करणे अत्यंत जिकिरीचे आणि कठीण मानले जाते. यामध्ये हजारो वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचे अचूक उच्चार आणि स्मरणशक्तीचा कस लागतो. देवव्रतने आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान मोदी यांनी देवव्रत महेश रेखे यांचे कौतुक केले.Vedamurti Devavrat Rekhe,
पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केले आहे ते येणाऱ्या पिढ्या नक्की लक्षात ठेवतील. भारतीय संस्कृतीबद्दल आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी 50 दिवसांत शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील 2000 मंत्रांचा समावेश असलेला दंडक्रम पारायण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केलं आहे. यामध्ये अनेक वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचा समावेश असतो, ते आपल्या गुरु परंपराच्या सर्वोत्तमतेचं मूर्त रूप आहेत. काशीचा खासदार म्हणून मला आनंद आहे की या पवित्र शहरात हे घडलं. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संतांना, विद्वानांना आणि भारतातील विविध संघटनांना माझा प्रणाम.”
योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही कौतुक
पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देवव्रत रेखे यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या या हिऱ्याने काशीमध्ये जाऊन वैदिक परंपरेचा झेंडा रोवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा मोठा सन्मान मानला जात आहे.
Vedamurti Devavrat Rekhe Dandakrama Parayana PM Modi Praise Ahilyanagar Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- PMOचे नाव आता सेवा तीर्थ असेल; देशभरातील राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखले जातील
- निवडणूक सुधारणांवर लोकसभेत 9 डिसेंबरला चर्चा, तत्काळ चर्चेवर अडून बसलेल्या विरोधकांना सरकारने राजी केले
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय PMO बनले सेवा तीर्थ!!
- Sheikh Hasina : हसीना यांना प्लॉट बळकावल्याप्रकरणी 26 वर्षांची शिक्षा; ब्रिटिश खासदार असलेली भाची आणि धाकट्या बहिणीलाही तुरुंगवासाची शिक्षा