• Download App
    राजस्थानात मुख्यमंत्रिपदाची चुरस वाढली; वसुंधराराजेंचे शक्तिप्रदर्शन, सकाळपासून रात्रीपर्यंत 30 हून अधिक आमदारांनी घेतली भेट|Vasundhara Raj's show of strength for Chief Ministership; More than 30 MLAs visited from morning till night

    राजस्थानात मुख्यमंत्रिपदाची चुरस वाढली; वसुंधराराजेंचे शक्तिप्रदर्शन, सकाळपासून रात्रीपर्यंत 30 हून अधिक आमदारांनी घेतली भेट

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे – मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जयपूरपासून दिल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली आहे.Vasundhara Raj’s show of strength for Chief Ministership; More than 30 MLAs visited from morning till night

    मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या वसुंधरा राजे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी शक्तीप्रदर्शन सुरू केले. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत 30 हून अधिक आमदार जयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते. तर 47 आमदार त्यांना भेटायला आल्याचा समर्थकांचा दावा आहे.



     

    भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार किती?

    खरं तर, रविवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या निकालात भाजपने पूर्ण बहुमतासह 115 जागा जिंकल्या. या निकालानंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा सुरू झाली.

    पहिला दावा वसुंधरा राजे यांचा आहे, कारण त्या दोनदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. इतर दोन मुख्यमंत्री चेहरे राजेंद्र राठोड आणि सतीश पुनिया निवडणुकीत पराभूत झाले.

    आता उरलेल्या चेहऱ्यांमध्ये अर्जुन राम मेघवाल, सीपी जोशी हे प्रमुख आहेत, पण दिया कुमारी, बालकनाथ यांचीही नावे चर्चेत आहेत.

    याशिवाय किरोरी लाल मीना, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ओम माथूर, माजी संघटन मंत्री प्रकाश चंद यांच्या नावांचीही चर्चा आहे.

    मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात चर्चा सुरू असतांना सोमवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीवरून त्या मुख्यमंत्री होणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. यावेळी त्यांना भेटायला आलेल्या अनेक आमदारांनी वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री बनवायचे असल्याचे एका आवाजात सांगितले, असा समर्थकांचा दावा आहे. एवढेच नाही तर त्यांना 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही केला जात आहे.

    राजस्थानातला विजय वसुंधरा राजेंनी बहाल केला मोदी, शाह आणि नड्डांच्या कुशल नेतृत्वाला!!

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह देखील होते. यासोबतच भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि खासदारही दिल्लीत पोहोचले आहेत.

    केंद्रात पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्या सर्व राज्यांमध्ये भाजपने नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपद देऊन आश्चर्य व्यक्त केले आहे. राजस्थानमध्येही अर्धा डझनहून अधिक नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अंतिम निर्णय पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या पातळीवर घेतला जाईल, मात्र तोपर्यंत भाजपमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

    Vasundhara Raj’s show of strength for Chief Ministership; More than 30 MLAs visited from morning till night

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट