वृत्तसंस्था
गाझियाबाद : वाराणसीत 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाहला गाझियाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. Varanasi Bomb blast : accused walliullah faces death sentence
जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. वलीउल्लाह हा आतापर्यंत कायदेशीर गुंतागुंतीमुळे शिक्षेपासून वाचत आला होता.
7 मार्च 2006 रोजी दशाश्वमेध घाट, संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावरही दहशतवादी वली उल्लाह आणि त्याच्या साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता, तर असून सुमारे 76 जण जखमी झाले होते.
5 एप्रिल 2006 रोजी पोलिसांनी प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलीउल्लाहला अटक केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी वाराणसीहून गाझियाबाद न्यायालयात ट्रान्सफर झाली होती.
दोन दिवसांपूर्वी 4 जून रोजी गाझियाबादचे जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या कोर्टाने वलीउल्लाहला दशाश्वमेध घाट आणि संकट मोचन मंदिरात बॉम्बस्फोट, खून, खुनाचा प्रयत्न, कायद्याविरुद्ध कृती, दहशत पसरवणे आणि स्फोटक पदार्थ वापरणे याप्रकरणी दोषी ठरवले होते. तर कँट रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटातील पुराव्याच्या आधारे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
– बाकीचे 3 आरोपी पाकिस्तानात पळाले
वलीउल्लाहच्या चौकशीत त्याचे साथीदार मुस्तकीम, झकेरिया आणि शमीम यांचीही नावे समोर आली होती. हे सर्वजण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. बॉम्बस्फोटाला 16 वर्षे झाली तरी हे आरोपी पकडले गेलेले नाहीत. सुरक्षा यंत्रणांनी मुसक्या आवळल्यानंतरही हे आरोपी बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पळून गेले आणि परतलेच नाहीत.
Varanasi Bomb blast : accused walliullah faces death sentence
महत्वाच्या बातम्या
- आपका मुसेवाला होगा; सलमान खानला वडिलांसह जीवे मारण्याची धमकी!!
- उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावे; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा टोला!!
- ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलासह 21 मंत्र्यांनी घेतली शपथ, काल सर्वांनीच एकत्र दिला होता राजीनामा
- खुद्द पंकजा मुंडे यांना नसेल एवढी मराठी माध्यमांनाच त्यांच्या राजकीय भवितव्याची “काळजी”!!