• Download App
    Vande Bharat In Bihar : पाटणा ते रांची दरम्यान धावणार 'वंदे भारत एक्स्प्रेस', आठ बोगी बिहारमध्ये पोहोचल्या Vande Bharat In Bihar Vande Bharat Express will run between Patna and Ranchi eight coaches reached Bihar

    Vande Bharat In Bihar : पाटणा ते रांची दरम्यान धावणार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’, आठ बोगी बिहारमध्ये पोहोचल्या

    (संग्रहित छायाचित्र)

    पाटणा ते रांचीपर्यंतच्या ट्रॅकची सुरक्षा मानकांनुसार दुरुस्ती केली जात आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहार आणि झारखंडसाठी मंगळवारी आनंदाची बातमी आली. आता बिहार आणि झारखंडमधील लोकांना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे डबे पाटणाला पोहोचले आहेत. यानंतर राजधानी पाटणा ते रांची दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन रुळांवर धावताना दिसणार आहे. Vande Bharat In Bihar Vande Bharat Express will run between Patna and Ranchi eight coaches reached Bihar

    या ट्रेनचे आठ डबे मंगळवारी पाटणा येथील राजेंद्र नगर रेल्वे स्थानकावर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. त्यानंतर या ट्रेनची ट्रायल रन करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास ‘वंदे भारत’च्या प्रत्यक्ष ऑपरेशनची तारीख निश्चित केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना आहे. या ट्रेनच्या ट्रॅकवर धावण्यापूर्वी राजधानी पाटणा ते रांचीपर्यंतच्या ट्रॅकची सुरक्षा मानकांनुसार दुरुस्ती केली जात आहे.

    पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही ट्रेन मुख्य मार्गावरून पाटणा येथे आणण्यात आली आहे. पाटणा-रांची मार्गासाठी 8 बोगी रेकचे वितरण करण्यात आले आहे. ट्रायल रन आणि ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर पाटणा-रांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

    Vande Bharat In Bihar Vande Bharat Express will run between Patna and Ranchi eight coaches reached Bihar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!