• Download App
    शेकडो विद्यार्थ्यी, सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना आज मुंबईतून वंदे भारत एक्सप्रेसची मोफत सफर Vande Bharat Express free travel from Mumbai today

    शेकडो विद्यार्थ्यी, सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना आज मुंबईतून वंदे भारत एक्सप्रेसची मोफत सफर

    वृत्तसंस्था

    मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या वंदे भारत एक्स्प्रेसमधून १२० विद्यार्थ्यांना शुक्रवारी मोफत सफर घडविण्यात येणार आहे. इतकेच नाही तर सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना देखील अशीच सफर घडविण्यात येणार आहे. Vande Bharat Express free travel from Mumbai today



    केंद्रीय, राज्य आणि रेल्वे शाळांमध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत. रेल्वेविषयी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवल्याने त्यांना मुंबई ते कल्याण असा प्रवास घडवला जाणार आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांमधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तब्बल 10000 व्हिडीओ बनवण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

    • वंदे भारत एक्स्प्रेस, भारतातील बुलेट ट्रेन आणि भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण, रेल्वेतील स्वच्छता अभियान या विषयांवर निबंध, कविता, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
    • कुलाबा येथील केंद्रीय विद्यालय आणि कल्याण रेल्वे शाळांसह एकूण १९ शाळांमध्ये ही स्पर्धा झाली.
    • या स्पर्धेतील विजेत्यांना आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत वंदे भारत प्रवास.
    •  सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. प्रत्येक गाडीमध्ये ६० विद्यार्थी असणार आहेत.
    • सीएसएमटी ते कल्याण, कल्याण ते नाशिक / पुणे, नाशिक ते शिर्डी आणि पुणे ते सोलापूर असं तीन टप्पे आहेत.
    • एका टप्प्यात प्रत्येकी १२० विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र तुकडी असेल. सीएसएमटीहून निघालेले विद्यार्थी कल्याण येथे उतरतील आणि कल्याणवरून अन्य विद्यार्थ्यांची तुकडी गाडीत प्रवेश करणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
    • फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांमधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने दिल्या आहेत.
    • ३ ते ४ लाख आणि त्याहून अधिक फॉलोअर्स असलेल्या यूट्युबर आणि इन्फ्लुएन्सर्सनाही वंदे भारतमधून प्रवास घडविण्यात येणार आहे.

    Vande Bharat Express free travel from Mumbai today

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र