Wednesday, 7 May 2025
  • Download App
    वैष्णोदेवीपर्यंत आता पायी जाण्याची गरज नाही : खेचर, हेलिकॉप्टर, पालखी सेवा विसरा; भाविकांच्या सेवेत लवकरच रोपवे प्रकल्प |Vaishno Devi Ropway Cable Car Project, No need To Walk For 12 KM For devotees

    वैष्णोदेवीपर्यंत आता पायी जाण्याची गरज नाही : खेचर, हेलिकॉप्टर, पालखी सेवा विसरा; भाविकांच्या सेवेत लवकरच रोपवे प्रकल्प

    प्रतिनिधी

    जम्मू : जम्मूमध्ये स्थित माता वैष्णोदेवीचे मंदिर हे भारतीय हिंदूंचे एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे, परंतु वैष्णोदेवीचे मंदिर इतर देवी स्थानांप्रमाणेच उंचीवर असल्याने अनेक भाविक विशेषत: जे वृद्ध आहेत किंवा चालण्यास असमर्थ आहेत, त्यांना येथील दर्शन नेहमीच दुर्लभ ठरलेले आहेत. मंदिराला भेट देणे त्यांना कठीण तर होतेच शिवाय महागही होते. अशा स्थितीत येथे रोपवे बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.Vaishno Devi Ropway Cable Car Project, No need To Walk For 12 KM For devotees

    आता अखेर सरकारने 250 कोटी खर्चाच्या या रोपवे प्रकल्पाची प्रक्रिया सुरू केली आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे पोहोचतात, 2022 च्या आकडेवारीनुसार, सुमारे 91 लाख भाविक येथे दर्शनासाठी आले होते, त्यापैकी बहुतेक जम्मूजवळ 5200 फूट उंचीवर असलेल्या त्रिकुट पर्वतावर स्थापित मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 12 किमी लांब चालतात.



    2.4 किमी लांबीच्या रोपवेसाठी निविदा

    आतापर्यंत जे भाविक देवीपर्यंत माथ्यावर जाऊ शकत नव्हते ते एकतर पिट्टू किंवा खेचरावर बसून पोहोचतात. ही पद्धत थोडी महाग आहे, त्यामुळे प्रत्येकाला ती वापरता येत नाही आणि मन अस्वस्थ राहते. याशिवाय 12 किमी जाण्यासाठी आणि येण्यासाठी पूर्ण 1 दिवस लागतो. परंतु हा रोपवे बसवल्यानंतर ही प्रक्रिया काही मिनिटांत होईल, RITES (रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस) ने या 2.4 किमी लांबीच्या रोपवेसाठी निविदा मागवल्या आहेत.

    हा रोपवे बांधल्यानंतर हजारो फूट उंचीवर असलेल्या या धार्मिक स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ 5 ते 6 तासांवरून कमी होऊन 6 मिनिटांवर येणार आहे. हा प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण होईल, आणि तो कटरा येथील बेस कॅम्प तारकोटपासून सुरू होईल आणि मंदिराजवळील सांझी छतपर्यंत जाईल. या रोपवेमध्ये गोंडोला केबल कार यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

    काय आहे गोंडोला केबल कार?

    गोंडोला केबल कारलाच एरियल रोपवे देखील म्हटले जाते. ही एक प्रकारची एरियल केबल कार प्रणाली आहे ज्यामध्ये एक केबिन पर्वत किंवा खाड्यांमधील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अनेक तारांद्वारे प्रवास करते. गोंडाला केबल कारमध्ये सामान्यत: दुहेरी वायर व्यवस्था असते. ज्यामध्ये दोन केबिन एका ट्रॅकवर प्रवास करतात, जे एक किंवा अनेक समान तारांवर असतात. अशाप्रकारे दोन्ही केबिन ट्रॅक्शन वायरच्या साहाय्याने घट्टपणे जोडल्या गेल्या आहेत, हे वायर्स डोंगरावर बांधलेल्या स्टेशनमध्ये बसवलेल्या पुलीमधून चालतात. पुलीच त्यांना पुढे-मागे आणण्याचे काम करते, अशा प्रकारे एक केबिन वर जाते आणि दुसरे खाली येते. दोन वर्षांपूर्वी माता वैष्णोदेवी मंदिरातील त्रिकुट पर्वत ते दुसऱ्या डोंगरावर असलेल्या भैरोन मंदिरापर्यंत रोपवे सुरू करण्यात आला होता.

    वेळ आणि पैशांची होणार बचत

    या रोपवेच्या उभारणीसाठी वेळ तर वाचणारच आहे, शिवाय हे हेलिकॉप्टर किंवा इतर पर्यायांपेक्षा खूपच स्वस्त असेल. 2018 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारकोट ते मंदिरापर्यंतच्या दुसर्‍या मध्यवर्ती मार्गाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये चढाई तुलनेने कमी आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी दिल्ली ते कटरा ही वंदे भारत ट्रेन 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती.

    कोणत्याही ऋतूत दर्शन शक्य होईल

    बोलीसाठी मागवण्यात आलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, आजही अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी 12 किमी चालणे पसंत करतात, परंतु ज्यांना याची सवय नाही त्यांना शिखरावर पोहोचणे कठीण जाते. विशेषत: ज्यांचे वजन जास्त आहे किंवा चालणे अशक्य आहे, ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास आहे किंवा जे वृद्ध आहेत, अशा लोकांसाठी हा रोपवे सोयीची ठरेल. या केबर कारमुळे 5200 फूट उंचीवर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा वेळ 5.6 तासांवरून अवघ्या 6 मिनिटांवर कमी होईल. यासोबतच या रोपवेमुळे एकीकडे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे, तर दुसरीकडे पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, कारण त्यात स्वार होऊन त्यांना डोंगराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहेत. त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल.

    याशिवाय उन्हाळ्याच्या काळात भाविक दिवसा मंदिरात जाणे टाळतात, मात्र रोपवे बसवल्यानंतर पर्यटकांना केव्हाही सहज मंदिरात जाता येणार असल्याचे कागदपत्रांमध्ये लिहिले आहे. त्याचप्रमाणे खेचरांमुळे होणारी घाण आणि प्रदूषणही होणार नाही. आणि वेळ कमी लागल्याने देवीच्या दरबारातील गर्दीही कमी होईल, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टळू शकेल.

    Vaishno Devi Ropway Cable Car Project, No need To Walk For 12 KM For devotees

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार

    Air strike on Pakistan : पाकिस्तानवर हवाई हल्ला, आज 244 ठिकाणी मॉक ड्रिल; हल्ल्यापासून वाचण्याचे मार्ग शिकवले जातील

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर- भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानवर एअर स्ट्राइक, 24 क्षेपणास्त्रे डागली, 100 हून जास्त अतिरेकी ठार