• Download App
    ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर! vahida rehman Dada Saheb Phalke award!

    ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

    माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती! vahida rehman Dada Saheb Phalke award!

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे : दादासाहेब फाळके पुरस्कार हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यंदा जेष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

    ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

    त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, वहिदा रेहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी वहिदा यांची प्रशंसा केली आहे. त्यापैकी प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी अशा प्रमुख चित्रपटांचा सामावेश आहे.

    दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या या कारकिर्दीत, त्यांनी आपल्या भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भुमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहिदा यांनी त्यांच्या कामाप्रती समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे.

    ज्या वेळी ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेने संमत केला आहे, त्या वेळी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या स्त्रीचा योग्य सन्मान आहे.वहीदा रहमानने यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्या भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, त्या शेवटच्या स्पोर्ट्स ड्रामा ‘स्केटर गर्ल’ मध्ये दिसल्या होत्या.

    vahida rehman Dada Saheb Phalke award!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!