भारत सरकारने कोविड लसीची निर्यात पुन्हा सुरू केल्यानंतर रविवारी लसीची पहिली खेप म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला पाठवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सिन मैत्री अंतर्गत भारताने आपल्या शेजारील देशांना लसीची एक खेप पाठवली आहे. यामध्ये कोविशील्डचे दहा लाख डोस म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला देण्यात आले आहेत आणि कोव्हॅक्सिनचे तीन लाख डोस इराणला देण्यात आले आहेत. Vaccine sent from India to 4 countries including Nepal, Myanmar under Vaccine Maitri Said Sources
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत सरकारने कोविड लसीची निर्यात पुन्हा सुरू केल्यानंतर रविवारी लसीची पहिली खेप म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला पाठवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सिन मैत्री अंतर्गत भारताने आपल्या शेजारील देशांना लसीची एक खेप पाठवली आहे. यामध्ये कोविशील्डचे दहा लाख डोस म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला देण्यात आले आहेत आणि कोव्हॅक्सिनचे तीन लाख डोस इराणला देण्यात आले आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या भयंकर लाटेदरम्यान, देशाला ऑक्सिजनसह लसीच्या कमतरतेचाही सामना करावा लागला. हे पाहता भारत सरकारने लसीच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली होती. त्याचबरोबर कोरोना संसर्गात घट झाल्यानंतर केंद्र सरकारने 20 सप्टेंबर रोजी निर्णय घेतला की, व्हॅक्सिन मैत्रीअंतर्गत ऑक्टोबरपासून लसीची निर्यात पुन्हा सुरू केली जाईल. भारताच्या या निर्णयाचे अनेक देशांनी स्वागत केले.
लसीच्या निर्यातीची घोषणा करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया म्हणाले की, कोव्हॅक्सची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी भारत ‘व्हॅक्सिन मैत्री’ उपक्रमाचा भाग म्हणून कोविड -19 लसींची निर्यात पुन्हा सुरू करेल. एका अहवालानुसार, भारताने आतापर्यंत ‘व्हॅक्सिन मैत्री’ अंतर्गत अनेक देशांमध्ये 66 दशलक्षाहून अधिक लसांची निर्यात केली आहे. याव्यतिरिक्त, कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर भारताने आपली लस उत्पादन क्षमतादेखील वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लसीची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे.
Vaccine sent from India to 4 countries including Nepal, Myanmar under Vaccine Maitri Said Sources
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल