• Download App
    बारा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या मुलांचे तातडीने लसीकरण व्हावे – आयएमएची मागणी । vaccination will be start for children says IMA

    बारा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या मुलांचे तातडीने लसीकरण व्हावे – आयएमएची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बारा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या मुलांचे तातडीने लसीकरण व्हावे म्हणून केंद्राने वेगाने पावले उचलायला हवीत, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केली आहे. vaccination will be start for children says IMA

    आरोग्यक्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना तातडीने बूस्टर देण्याबाबत निर्णय घेतला जावा असेही या संघटनेने म्हटले आहे. देशभरातील कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते.’’



    असा इशाराही त्यांनी दिला आहे. देशभरात ओमिक्रॉनची लागण झालेले २३ पेक्षाही अधिक रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतचे या विषाणूचे स्वरूप लक्षात घेतले तर तो सर्वाधिक वेगाने पसरणारा विषाणू असल्याचे दिसून आले आहे, असे ‘आयएमए’ने म्हटले आहे. ‘‘ देशाची अर्थव्यवस्था ही कोरोना संसर्गाच्या सावटातून सावरत असताना हा संसर्ग वाढला तर तिला मोठा फटका बसू शकतो. आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर तिसरी मोठी लाट येऊ शकते.’’ असा इशाराही ‘आयएमए’कडून देण्यात आला आहे.

    vaccination will be start for children says IMA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख