Vaccination Record : कोरोना लसीकरणाबाबत भारताने एक नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. कोरोना लस देण्याची मोहीम जानेवारी 2021 मध्ये भारतात सुरू झाली होती, तेव्हापासून 32 कोटींपेक्षा जास्त लस डोस देण्यात आले आहेत. याबाबतीत भारताने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. Vaccination Record India overtakes America in giving Corona vaccine, reached number one in the world
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबत भारताने एक नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. कोरोना लस देण्याची मोहीम जानेवारी 2021 मध्ये भारतात सुरू झाली होती, तेव्हापासून 32 कोटींपेक्षा जास्त लस डोस देण्यात आले आहेत. याबाबतीत भारताने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, लसीचे 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 डोस आतापर्यंत भारतातील लोकांना देण्यात आले आहेत. अमेरिकेत लसीचे 32 कोटी 33 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 7 कोटींहून जास्त डोस देण्यात आले आहेत.
लस देण्याबाबत भारताने अमेरिकेला मागे टाकले
लसीकरणाच्या बाबतीत, भारताने बर्याच दिवसांपूर्वी यूकेला मागे सोडले होते. अमेरिका हा एकमेव देश बाकी होता, जो लसीकरणामध्ये भारताच्या पुढे होता. आता भारताने त्यालाही मागे टाकले आहे. जर्मनी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे आतापर्यंत 714 दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले आहेत. फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे, आतापर्यंत 5 कोटी 24 लाखांपेक्षा जास्त लसींचे डोस येथे देण्यात आले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, “कोविड-19 लसीकरणाबाबत भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. कोरोना लसीच्या एकूण डोसच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे.”
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतचा डेटा जाहीर केला आहे. यानुसार, कोरोना लसीकरणाचे काम इतर देशांच्या तुलनेत उशिरा भारतात सुरू झाले. आकडेवारीत असे सांगितले आहे की, भारतात लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आली होती, तर ब्रिटनमध्ये लसीकरण मोहीम 8 डिसेंबर 2020 पासून सुरू झाली. अमेरिकेत 14 डिसेंबरपासून इटली, जर्मनी आणि फ्रान्समध्ये 27 डिसेंबर 2020 रोजी लसीकरण सुरू झाले. पण या सर्व देशांना मागे ठेवून भारत लस देण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Vaccination Record India overtakes America in giving Corona vaccine, reached number one in the world
महत्त्वाच्या बातम्या
- Gupkar Alliance Meeting : गुपकार गटाची बैठक आज, पीएम मोदींशी बैठक आणि पुढच्या रणनीतीवर चर्चा
- Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीर एन्काउंटरमध्ये लश्करच्या टॉप कमांडर अबरारसह दोघांचा खात्मा
- अमूलचा गुजरातमध्ये दुधाला महाराष्ट्रापेक्षा अधिक दर ; २९ रुपये लिटरनेच खरेदी
- कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन रोखू; पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना इशारा
- MONSTER-Twitter : अक्षम्य अपराध वारंवार ;भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वगळलं ; भारतीय भडकले