गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीपासून शिकवण घेत सावध राहायला हवे. वाढत्या कोरोना संक्रमनामुळे देशात सध्या लसीकरणासोबतच ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Vaccination is not an option without tracking, testing and treatment, PM appeals
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या कोरोना महामारीपासून शिकवण घेत सावध राहायला हवे. वाढत्या कोरोना संक्रमनामुळे देशात सध्या लसीकरणासोबतच ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मोदी यांनी मतदारसंघाच्या रुग्णालयांतील बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अन्य अत्यावश्यक औषधांच्या आढावा घेतला. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान म्हणाले, मास्क वापरण्यासोबतच सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. देशातील 45 वर्षांवरील लोकांमध्ये लसीकरणासाठी जागरुकता निर्माण करायला हवी. देशातील कोरोनाकाळात आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि इतर व्यक्तींचे आभार मानायला हवेत.