• Download App
    करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर । Vaccination campaign against Corona virus begins fast, big news about vaccination of children in the age group of 12 to 14 years

    करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर

    आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. Vaccination campaign against Corona virus begins fast, big news about vaccination of children in the age group of 12 to 14 years


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे.दरम्यान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे लसीकरण. केंद्र सरकारने भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

    १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान आज त्या माहितीचे खंडण करण्यात आले आहे.तसेचं या १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

    आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.

    Vaccination campaign against Corona virus begins fast, big news about vaccination of children in the age group of 12 to 14 years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य