विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आता घरामध्येही मास्क घालण्याची वेळ आली असून पाहुण्यांना देखील घरी बोलावता कामा नये. कोरोनाबाबत लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते अशी भीती नीती आयोगातील आरोग्य मंत्रालयाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी व्यक्त केली आहे. V. K. paul gave suggestions to govt. and peoples
पॉल म्हणाले की, ‘‘ आता संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, शारीरिक अंतर न पाळणारी एखादी व्यक्ती ३० दिवसांमध्ये ४०६ लोकांना बाधित करू शकते. घरगुती विलगीकरणामध्ये असलेल्या बाधा न झालेल्या व्यक्तीने मास्क घातला असेल आणि बाधित व्यक्तीने तो घातला नसेल तर संसर्ग होण्याचा धोका हा ३० टक्के असतो.
येथे बाधित आणि बाधा न झालेल्या रुग्णाने देखील मास्क घातला असेल तर संसर्ग होण्याचा धोका केवळ १.५ टक्के एवढाच राहतो. लोकांनी केवळ भीतीपोटी रुग्णालयामध्ये दाखल होणे टाळावे, औषधे देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.