• Download App
    उत्तराखंडमध्ये बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांपैकी १२ जणांचे मृतदेह शोध पथकाला आढळले । Uttarakhand rains flood update bodies of 12 of the missing trekkers were recovered

    उत्तराखंडमध्ये बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांपैकी १२ जणांचे मृतदेह शोध पथकाला आढळले

    वृत्तसंस्था

    ऋषिकेश : उत्तराखंडमध्ये काही दिवसांपूर्वी १८ गिर्यारोहक बेपत्ता झाले होते. त्या पैकी १२ जणांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले आहेत.
    उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे आले आहेत. लामखागा खिंडीत हवाई दलाचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. Uttarakhand rains flood update bodies of 12 of the missing trekkers were recovered



    उत्तराखंडमधील लामखागा खिंडीत हवाई दलाचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. लामखागा खिंडीत १७ हजार फूट उंचीवर, ट्रेकिंगसाठी गेलेले खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे आपला रस्ता चुकले होते. १८ ऑक्टोबर रोजी १८ गिर्यारोहक लामखागाजवळ हिमालयीन ट्रॅकवर गेले होते. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे काही सदस्य हरवले. तेव्हापासून सर्व बेपत्ता आहेत. मात्र शोधमोहिमेनंतर १२  ट्रेकर्सचे मृतदेह सापडले आहेत. दोघांची सुटका करण्यात आली आहे तर दोघांचा तपास सुरू आहे.

    हिमाचल प्रदेशच्‍या किन्‍नौर जिल्‍ह्याला उत्‍तराखंडच्‍या हरसिलशी जोडणारा लमखगा पास हा सर्वात धोकादायक पास आहे. लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत आहेत.

    Uttarakhand rains flood update bodies of 12 of the missing trekkers were recovered

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!