• Download App
    Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, 14 फेब्रुवारीला मतदान, वाचा सविस्तर... । Uttarakhand Election 2022: Single phase elections in Uttarakhand, polling on February 14, read more

    Uttarakhand Election २०२२ : उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, १४ फेब्रुवारीला मतदान, वाचा सविस्तर…

    Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यावेळी उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या दरम्यान, कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची खात्री केली जाईल. 10 मार्चला निकाल लागणार आहे.


    वृत्तसंस्था :

    नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यावेळी उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या दरम्यान, कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची खात्री केली जाईल. 10 मार्चला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत.

    उत्तराखंडमध्ये सध्या भाजप सरकार

    उत्तराखंडमध्ये सध्या भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. पक्षाने आताच्या विधानसभेतील 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या. 2017च्या निवडणुकीत काँग्रेसने 11 जागा जिंकल्या होत्या, तर इतर पक्षांच्या खात्यात 2 जागा होत्या. 70 जागांच्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च 2022 रोजी संपत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले होते. त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री झाले, पण त्यांना चार वर्षांनी हटवून भाजपने प्रथम तीरथसिंग रावत यांना आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री बनवले.

    उत्तराखंडमध्ये भाजपसमोर सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान

    उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. मात्र, उत्तराखंडच्या राजकारणातही बसपाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर, पहिल्या तीन विधानसभा निवडणुकीत बसपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, मोदी लाटेमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तराखंड, हरिद्वार आणि नैनिताल या मैदानी जिल्ह्यांमध्ये अशा अनेक जागा आहेत, जिथे राजकारण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या मन:स्थितीवर अवलंबून आहे. या जागांवर शेतकरी निवडणुकीत समीकरण घडवण्यात आणि बिघडवण्याची क्षमता ठेवतात.

    2017चा काय होता निकाल?

    उत्तराखंडमध्ये एकूण जागा – 70,
    बहुमताचा आकडा – 36
    भाजप- 57
    काँग्रेस- 11
    इतर- 2

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला