एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांमध्ये एका महिला कैद्याचाही समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंगातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कारागृहात बंदिस्त ४४ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांमध्ये एका महिला कैद्याचाही समावेश आहे. Uttarakhand 44 prisoners found HIV positive in Haldwani jail
सुशीला तिवारी हॉस्पिटलचे एआरटी सेंटर इन्चार्ज डॉ. परमजीत सिंग यांनी सांगितले की, कारागृहात एचआयव्ही पॉझिटिव्ह कैद्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे तुरुंग प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कैद्यांवर उपचाराबाबत माहिती देताना डॉ.सिंग म्हणाले की, एचआयव्ही रुग्णांसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सेंटर सुरू करण्यात आले असून, तेथे बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. माझी टीम तुरुंगातील कैद्यांची सतत चाचणी घेत आहे. एचआयव्ही बाधित कैद्याला मोफत उपचार आणि औषधे दिली जात आहेत. या कैद्यांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार दिले जात आहेत.
Uttarakhand 44 prisoners found HIV positive in Haldwani jail
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट
- कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा
- राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे