विशेष प्रतिनिधी
झांसी : झांसी रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने ना हरकत दाखला दिला होता. आता झांसी रेल्वे स्थानक हे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन (Veerangana Lakshmibai Railway Station) म्हणून ओळखलं जाणार आहे.UTTAR PRADESH: Yogi government changes name of Jhansi railway station; Now Veerangana Lakshmibai Railway Station!
राणी लक्ष्मीबाईंचं नाव–
भाजपचे राज्यसभा खासदार प्रभात झा यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही वर्षांपूर्वी झांसी इथं झालेल्या रेल्वे बैठकीत झांसी रेल्वे स्थानकाला राणी लक्ष्मीबाई यांचं नाव देण्याची मागणी केली होती.
त्यावर, रेल्वेने सहमती दर्शवून प्रक्रिया सुरू केली होती. गृह मंत्रालय आणि आता यूपी सरकारची याला मंजुरी मिळाली आहे. बुंदेलखंडच्या लोकांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं झांसीचे खासदार अनुराग शर्मा यांनी म्हटलं आहे.
या रेल्वे स्थानकांची नावं बदलली–
- पहा कोणत्या रेल्वे स्थानकांची नावं बदलली-
- यूपी सरकारने याआधीही अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत.
- अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज,
- मुघलसरायचे दीनदयाळ उपाध्याय
- फैजाबादचं नाव अयोध्या केलं आहे.
- वाराणसीचं मंडुआडीह स्टेशन.मंडुआडीह स्टेशनचे नाव बदलून बनारस स्टेशन असे करण्यात आलं आहे.
- नौगढ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून सिद्धार्थनगर करण्यात आलं.
गृहमंत्रालयाची मंजूरी महत्त्वाची-
रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याच्या प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्त्वाची भूमिका आहे. राज्य सरकार रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचा विनंती केंद्र सरकारला करतं. केंद्र सरकार हा प्रस्ताव इंटेलिजन्स ब्युरो, पोस्ट विभाग, भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय यांसारख्या अनेक विभाग आणि एजन्सींना एनओसी पाठवते. विभाग आणि एजन्सीकडून एनओसी मिळाल्यानंतर, गृह मंत्रालय नाव बदलण्यास मान्यता देते.
UTTAR PRADESH: Yogi government changes name of Jhansi railway station; Now Veerangana Lakshmibai Railway Station!
महत्त्वाच्या बातम्या
- आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा – मोदी यांचे आवाहन
- महाराष्ट्रात पुन्हा वाढू लागला कोरोनाचा संसर्ग, पुढील दोन-तीन आठवडे महत्त्वाचे
- खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी
- झाशीच्या राणीचा गौरव, झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन नामकरण