• Download App
    उत्तरप्रदेश : मानव-पक्षी मैत्रीचा विचित्र शेवट; जखमी अवस्थेतील 'सारस' घरी आणून १३ महिने जीव लावला अन्...Uttar Pradesh  Strange end to human bird friendship  After bringing home an injured sarus crane  

    उत्तरप्रदेश : मानव-पक्षी मैत्रीचा विचित्र शेवट; जखमी अवस्थेतील ‘सारस’ घरी आणून १३ महिने जीव लावला अन्…

    या मैत्रीची सर्वत्र चर्चा होत होती; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

    विशेष प्रतिनिधी

    रायबरेली :  मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये, मोहम्मद आरिफ यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील त्यांच्या मंधका गावात सापडलेला एक जखमी अवस्थेतील सारस पक्षी घरी आणला होता. त्यानंतर पुढच्या तेरा महिन्यांत त्यांनी त्याची काळजी घेतली. यामुळे हा पक्षी आणि आरीफ यांची चांगली मैत्री झाली होती, या मैत्रीची सर्वत्र चर्चा होत होती. मात्र या मैत्रीचा शेवट अखेर विचित्र पद्धतीने झाला.  शनिवारी आरीफ यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सारस हा उत्तर प्रदेशचा राजकीय पक्षी आहे. Uttar Pradesh  Strange end to human bird friendship  After bringing home an injured sarus crane

    वन्यजीव अधिकाऱ्यांनी मंगळवारी आरिफच्या घरातून रायबरेली अभयारण्यामध्ये सारस पक्षाला हलवल्यामुळे, या मानव-पक्षी मैत्रीचा उलगडा आणि शेवटही झाला. त्यानंतर आता हा सारस पक्षी कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात आहे.

    सारस सामान्यतः आर्द्र प्रदेशात आढळतो, हा उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी आहे आणि १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची ३ अंतर्गत संरक्षित आहे. ते जगातील सर्वात उंच उडणारे पक्षी आहेत.

    आरिफने सांगितले की त्याला एका शेतात पाय तुटलेला नर सारस पक्षी सापडला. “मी त्याला घरी आणला आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. मी जखमेवर हळद आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट लावली आणि पायाला आधार देण्यासाठी एक काठी बांधली. आम्ही आमच्या कोंबड्यांसाठीही तेच करतो.”

    आरीफ यांनी सांगितले की ‘’त्यांनी त्या पक्षाला कधीच बंदिस्त ठेवले नाही. “काही आठवड्यांतच पक्षी बरा होऊ लागला आणि लवकरच तो उडू लागला आणि घराबाहेरील अंगणातच त्याने मुक्काम केला. आरीफ जेव्हा मोटारसायकलवरून गावात जायचे, तेव्हा हा पक्षी त्यांचा पाठलाग करायचा, हवे तेव्हा जंगलात जायचा आणि संध्याकाळी पुन्हा घरी यायचा, माझ्यासोबत जेवायचा.’’

    Uttar Pradesh  Strange end to human bird friendship  After bringing home an injured sarus crane

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!