उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण व महसूल राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. विजय कश्यप 52 वर्षांचे होते. कोरोनामुळे निधन झालेले ते उत्तर प्रदेशातील पाचवे आमदार आहेत. uttar pradesh minister and charthawal mla vijay kashyap Death Due to covid 19
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण व महसूल राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. विजय कश्यप 52 वर्षांचे होते. कोरोनामुळे निधन झालेले ते उत्तर प्रदेशातील पाचवे आमदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय कश्यप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केले की, “उत्तर प्रदेश सरकारमधील भाजप नेते आणि मंत्री विजय कश्यपजी यांच्या निधनाने अत्यंत दुःखी आहे. त्यांची जमिनीशी नाळ होती आणि लोकहिताच्या कार्यात नेहमीच निष्ठावान होते. दु:खाच्या या प्रसंगात त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती!”
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महसूल व पूर नियंत्रण राज्यमंत्री विजय कुमार कश्यप यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “विजय कुमार कश्यप हे एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नेहमीच राज्य सरकारचे मंत्री म्हणून कौशल्याने कर्तव्य पार पाडले. कश्यप यांच्या निधनामुळे जनतेचा सच्चा हितैषी गमावला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत शोकसंतप्त कुटुंबीयांना संवेदना व्यक्त केल्या.
विजय कश्यप यांनी 2007 आणि 2012 मध्ये चरथावल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. पण 2017च्या निवडणुकीत पहिल्यांदाच कश्यप भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. ऑगस्ट 2019 मध्ये योगींनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा विजय कश्यप यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.
uttar pradesh minister and charthawal mla vijay kashyap Death Due to covid 19
महत्त्वाच्या बातम्या
- Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा
- Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट
- ऐवढाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा पोटगीचे आकर्षण , हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर स्त्रीद्वेष्टे असल्याची टीका
- विजय मल्याला लंडनच्या न्यायालयाचा दणका, दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली
- उत्तर प्रदेशातील दोन सिंहिणींची प्रकृती कोरोनामुळे गंभीर, इटावा लायन सफारीतील गौरी आणि जेनीफरने सोडले खाणे