विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पैशाचा वापर वाढला असल्याचे दिसू लागले आहे. एकाच दिवशी पोलीसांनी आठ कोटी रुपयांची रोकड पकडली. कानपूरच्या काकादेव पोलीस स्टेशन हद्दीत एका व्हॅनमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.Uttar Pradesh election money started flowing out, eight crore rupees were seized in a single day
स्वरूप नगर परिसरातूनही 1 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. ठिकठिकाणी टाकल्या जात असलेल्या छाप्यांदरम्यान रोकड हाती लागत आहे. या प्रकरणी आयकर पथकही तपास करत आहे.
पोलिसांनी सर्वप्रथम काकादेव परिसरात सीएमएस कंपनीच्या कारमधून पाच कोटींहून अधिक रोकड जप्त केली.
ही रोकड कानपूरच्या केस्को या वीज कंपनीची आहे व ती बँकेत नेली जात होती, असे स्पष्टीकरण कंपनीच्या कर्मचाºयांनी दिले आहे. परंतु घटनास्थळी पोलिसांना त्यांच्या या दाव्यासंबंधी कोणताही कागद सापडला नाही. यानंतर स्वरूप नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुसरी रोकड जप्तीची कारवाई करण्यात आली. येथे कंपनीच्या वाहनातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय 1 कोटी 74 हजार रुपयांची रक्कम सापडली. संबंधित सुरक्षा गाडीत चार कर्मचारी होते.
जप्त केलेली रक्कम बँकांच्या एटीएमसाठी घेऊन जात असल्याचे कारवाई करण्यात आलेल्या वाहनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलिसांना घटनास्थळी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. दुसऱ्या एका खासगी वाहनात पोलिसांना सहा लाखांची रोकड सापडली आहे. रोख रक्कम जवळ बाळगणाऱ्यांना कोणतीही कागदपत्रे दाखवता आली नाहीत.
कानपुर शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून सात कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत आम्ही आयकर विभागाला माहिती दिली असून त्यांच्याकडूनही रोख रक्कमेची पडताळणी केली जात आहे. या रक्कमेचा निवडणूक प्रचारात वापर केला जाणार होता का, यादृष्टीने अधिक तपास केला जात आहे, असे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
Uttar Pradesh election money started flowing out, eight crore rupees were seized in a single day
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीच्या चौकशीत सचिन वाजेंचा खुलासा, ‘अनिल देशमुखांनी परत सेवेत घेण्यासाठी २ कोटींची मागणी केली, वसुली करून त्यांना दिले ४ कोटी ७० लाख’
- यूपीमध्ये शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल, संजय राऊत म्हणाले- 100 उमेदवार उभे करू, ओवैसींवरील हल्ल्याला सांगितले नाटक
- किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात पुण्यात शिवसेना – भाजप मध्ये जोरदार राडेबाजी; राष्ट्रवादीची मात्र भाजपचे नगरसेवक फोडाफोडी!!
- राज्य महिला आयोग कंपन्यांवर अचानक टाकणार छापे, महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीची होणार पाहणी