• Download App
    Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

    Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी!

    Yogi Adityanath

    मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता फोन


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Yogi Adityanath उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी देण्यात आली असून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांनाही याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहेYogi Adityanath



    विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला, ज्यामध्ये आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे त्यांची हत्या केली जाईल, असा संदेश देण्यात आला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, योगी आदित्यनाथ राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येऊ शकतात म्हणून पोलीस सतर्क आहेत. त्यांनी धमकीच्या संदेशाची चौकशी सुरू केली आहे

    नुकतेच राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले होते. आता सीएम योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या धमकीमध्ये त्यांना बाबा सिद्दीकींसारखी वागणूक दिली जाईल असंही म्हटलं आहे.

    उल्लेखनीय म्हणजे योगी आदित्यनाथ यांना धमक्या मिळण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही योगी आदित्यनाथ यांना अनेकदा अशा धमक्या आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्चच्या सुरुवातीला, लखनौमधील नियंत्रण कक्ष सुरक्षा मुख्यालयात रात्री कॉल करण्यात आला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्येही योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

    Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath threatened to kill

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!