• Download App
    Ustad Rashid Khan's car impounded in Kolkata

    उस्ताद रशीद खानांची कार कोलकात्यात जप्त; चालक दारू प्यायलाचा पोलिसांचा आरोप, तर पोलिसांनी त्रास दिल्याचा खान परिवाराचा आरोप

    वृत्तसंस्था

    कोलकाता : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण उस्ताद राशीद खान यांनी लाच देण्यास नकार दिल्यामुळे  पश्चिम बंगाल पोलिसांनी छळ केल्याचा आरोप परिवाराने केला आहे. पण रशीद खान यांचा चालक दारू पिऊन गाडी चालवत होता त्यामुळे गाडी जप्त करून त्याला अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. Ustad Rashid Khan’s car impounded in Kolkata

    कोलकात्याच्या दमदम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका प्रसिद्ध संगीतकाराला सोडल्यानंतर रशीद खान यांचा चालक कार घेऊन परतत होता. त्यावेळी बेलेघाटा ट्रॅफिक गार्ड पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि लाच मागितली. परंतु, पैसे देण्यास चालकाने नकार दिल्याने त्याला अटक करून प्रगती मैदान पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिस रशीद खान यांचे वाहनही ठाण्यातच ठेवून घेतले, असे रशीद खान यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.


    लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉंग्रेस नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.


    घटनेची माहिती मिळाल्यानंतर रशीद खान यांनी पहाटे पोलीस ठाण्यात फोन करून चालकाला अटक करण्याचे कारण विचारले. त्यावेळी राशीद खान यांना पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. खान यांनी पोलीस ठाणे गाठल्यानंतर चालकाला आणि कारला सोडून देण्यात आले. पणया घटनेमुळे खान यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची माहिती राज्याचे मंत्री इंद्रनील सेन यांना फोनवरून आधीच दिली होती. अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनाही या घटनेची स्वतंत्रपणे माहिती दिली. मात्र, पोलिसांनी दाद दिली नाही, असे खान कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

    उस्ताद राशीद खान यांना यावर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते रामपूर-सहस्वान घराण्यातील आहेत. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

    Ustad Rashid Khan’s car impounded in Kolkata

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून