• Download App
    रुपे डेबिट कार्ड, भीम अ‍ॅप वापरा इंसेटिव्ह मिळवा; मोदी सरकारची 2600 कोटींची तरतूद Use RuPay Debit Card, BHIM app and get incentives

    रुपे डेबिट कार्ड, भीम अ‍ॅप वापरा इंसेटिव्ह मिळवा; मोदी सरकारची 2600 कोटींची तरतूद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅपवरील व्यवहारांना आणखी चालना मिळावी यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅपला चालना मिळावी यासाठी तब्बल 2600 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. Use RuPay Debit Card, BHIM app and get incentives

    केंद्र सरकार नेहमीच डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देते. हे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल देवाणघेवाण प्रक्रिया ही सोयीची व्हावी यासाठी 2600 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. 2022 – 2023 या आर्थिक वर्षात रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅप वापरणाऱ्यांना सरकारकडून इंसेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. रुपे डेबिट कार्ड, भीम अ‍ॅपला चालना देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.

     काय फायदा मिळणार?

    •  रुपे डेबिट कार्डाद्वारे व्यवहार केल्यास 0.4 % इंसेंटिव्ह (परतावा) मिळेल.
    •  भीम यूपीआयद्वारे 2000 रुपयांपेक्षा कमी व्यवहार केल्यास 0.25 % इंसेंटिव्ह मिळेल.
    •  भीम यूपीआयद्वारे इंडस्ट्रीसाठी होणाऱ्या डिजिटल व्यवहारावर 0.15 % परतावा मिळेल.

    Use RuPay Debit Card, BHIM app and get incentives

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे