वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅपवरील व्यवहारांना आणखी चालना मिळावी यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅपला चालना मिळावी यासाठी तब्बल 2600 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. Use RuPay Debit Card, BHIM app and get incentives
केंद्र सरकार नेहमीच डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देते. हे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल देवाणघेवाण प्रक्रिया ही सोयीची व्हावी यासाठी 2600 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. 2022 – 2023 या आर्थिक वर्षात रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅप वापरणाऱ्यांना सरकारकडून इंसेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. रुपे डेबिट कार्ड, भीम अॅपला चालना देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.
काय फायदा मिळणार?
- रुपे डेबिट कार्डाद्वारे व्यवहार केल्यास 0.4 % इंसेंटिव्ह (परतावा) मिळेल.
- भीम यूपीआयद्वारे 2000 रुपयांपेक्षा कमी व्यवहार केल्यास 0.25 % इंसेंटिव्ह मिळेल.
- भीम यूपीआयद्वारे इंडस्ट्रीसाठी होणाऱ्या डिजिटल व्यवहारावर 0.15 % परतावा मिळेल.
Use RuPay Debit Card, BHIM app and get incentives
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजलना हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 लाखाचा दंड
- संघ मुसलमानांना का घाबरतो?, मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकतेची बात करतात; असदुद्दीन ओवैसींचा दावा
- ईडी, इन्कम टॅक्स छाप्यांवेळी हसन मुश्रीफ खेळले मुस्लिम कार्ड; म्हणाले, नवाब मलिक, मुश्रीफ, अस्लम शेखांवरच कारवाई का?
- साखर कारखाना घोटाळा, जावयाला कॉन्ट्रॅक्ट; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी – इन्कम टॅक्सचे छापे
- अदानी भेटून गेल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; धारावी पुनर्विकासाची चर्चा की शिजली वेगळीच खिचडी??